मुंबई | अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा सोशल मिडीयावर खूप जास्त अॅक्टिव्ह असते. शिल्पा सोशल मिडीयवरुन आपल्या चाहत्यांबर सतत काही न काही शेअर करते. शिल्पा अलिकडे चित्रपटात दिसत नसली तरी ती बऱ्याचदा रिएलिटी शोजमध्ये जजच्या भूमिकेत झळकते.
शिल्पा अनेकदा सोशल मिडीयावर व्हिडिओ शेअर करत आपल्या चाहत्यांना हसवते. अशातच आता शिल्पाचा आणखी एक मजेशीर व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. शिल्पाने या व्हिडिओमध्ये मेकअप आर्टिस्टच्या कानशीलात वाजवल्याचे दिसत आहे.
अर्थातच शिल्पाचा हा व्हायरल होणारा व्हिडिओ कॉमेडी आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, शिल्पा एका सेटवर उभी आहे. आसपास बरेच लोक उभे दिसत आहे. शिल्पाचो मेकअप आर्टिस्ट शिल्पाचा मेकअप करताना दिसत आहे.
पाठिमागे एक गाणं चालू आहे. गाणं चालू असताना शिल्पा शेट्टी त्याच्या कानशिलात वाजवते आणि मेक अप आर्टिस्ट पाठीमागे पडण्याची अॅक्शन करतो. शिल्पाचे चाहते या व्हिडीओला भरभरुन प्रेम देत आहेत.
दरम्यान, अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा एक जुना व्हिडिओ देखील सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पा शेट्टीनं अक्षय कुमारवर अत्यंत धक्कादायक आरोप केले आहेत.
व्हिडिओमध्ये शिल्पानं अक्षयने माझा वापर करुन मला सोडून दिलं असल्याचा आरोप केला आहे. शिल्पाच्या म्हणण्यानुसार ती अक्षयच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. मात्र अक्षयनं तिला धोका दिला.
ट्विंकल खन्नासाठी अक्षयनं शिल्पाला धोका दिला आणि तिचा वापर करुन घेतला आहे, असं शिल्पाचं म्हणनं आहे. हा जुना व्हिडिओ व्हायरल होऊ लागल्यानंतर नेटकरी अक्षयला टार्गेट करु लागले आहेत.
View this post on Instagram
महत्वाच्या बातम्या-
“…म्हणून मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबादारी म्हणून पदाचा राजीनामा द्यावा”
‘या’ प्रकरणातील सत्य बाहेर आलं तर ठाकरे सरकार पडेल – कंगना राणावत
सचिन वाझे यांच्या अ.टकेनंतर शरद पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया
सोशल मिडीयावर सायली संजीवचा ‘हा’ सीन होतोय व्हायरल, पाहा व्हिडीओ
‘सचिन वाझे यांची नार्को टेस्ट करा, दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ दे’ – राम कदम