अनुपम खेर यांचे बॉलिवुडबाबत मोठे वक्तव्य; म्हणाले, दाक्षिणात्य चित्रपट कथेवर लक्ष केंद्रीत…

मुंबई | अमिर खानचा (Aamir Khan) अलिकडे आलेला चित्रपट लालसिंग चड्डा (Lalsingh Chaddha) यावर प्रेक्षकांनी बहिष्कार टाकावा, अशा स्वरुपाची मागणी केली गेली. त्यामुळे हा चित्रपट जोरदार आपटला.

त्यामुळे बॉलिवूड आणि दाक्षिणात्य (South Film Industry) चित्रपट हा वाद निर्माण झाला होता. आता त्यात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी उडी घेतली आहे. त्यांनी आपले परखड विचार मांडले आहेत.

एकीकडे दाक्षिणात्य सिनेमांचे हिंदीकरण करुन त्यातून मोठा नफा कमाविला जात आहे, तर दुसरीकडे एका मागे एक बॉलिवूड (Bollywood) चित्रपट आपटत आहेत. त्यामुळे बॉलिवूड सध्या मोठ्या विवंचनेत आहे.

दाक्षिणात्य चित्रपट कथेवर लक्ष केंद्रीत (Story Centric Movies) केले जाते. तर बॉलिवूडचे चित्रपट हे स्टारकेंद्रीत (Actor Centric) असतात, असे अनुपम खेर म्हणाले. नुकताच प्रदर्शित झालेला कार्तिकेय 2 हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल उडवत आहे.

तर दुसरीकडे लालसिंग चड्डा आणि आणि दोबारा (Dobara) सारखे चित्रपट प्रेक्षकांवर आपला प्रभाव पाडू शकत नाही आहेत.

खेर म्हणाले, तुम्ही जर ग्राहकांसाठी एखादी गोष्ट बनविता आणि जेव्हा तुम्ही तुमच्या ग्राहकांकडे दुर्लक्ष करता, तेव्हा खऱ्या समस्येला सुरुवात होते. आम्ही मोठे चित्रपट निर्माण करुन तुमच्यावर उपकार करतोय, असे वागू नये, असे स्पष्ट मत अनुपम खेर यांनी मांडले.

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या स्पष्ट आणि परखड मतामुळे आता बॉलिवूडमध्ये काय उपाययोजना होतील आणि बॉलिवूड आपला ढासळलेला दर्जा कधी उंचावणार, हे पाहणे आगामी काळात महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ; शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र आले

मोठी बातमी! काँग्रेसला मोठा दणका, एका माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा

‘आदित्य ठाकरेंची दिशा चुकली’ या घोषणेमागील ‘दिशा’ कोण? भरत गोगावले म्हणाले,

पाषाण तलाव परिसरात आणि उद्यानात प्रेमी युगुलांना बंदी; जाणून घ्या कारण

आनंद दिघे यांच्या स्मृतिदिनी एकनाथ शिंदे यांनी पोस्ट केली कविता