मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली. मागील काळात शिवसेनेचे नेेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षात बंड केल्याने शिवसेना फुटली. त्यामुळे शिवसेनेला नव्याने पक्ष बांधणी करावी लागली.
मागील महिन्यात राष्ट्रवादीच्या नेत्या आणि आंबेडकरी चळवळीचा आवाज सुषमा आंधारे (Sushama Andhare) यांनी शिवसेनेेत प्रवेश केला. आता शिवसेनेने संभाजी ब्रिगेडसोबत (Sambhaji Brigade) युती केली आहे. त्यामुळे शिवसेनेेची ताकद वाढली आहे.
येथून पुढे शिवसेना (Shivsena) आणि संभाजी ब्रिगेड एकत्र राजकीय प्रवास करणार आहेत. त्यांनी त्याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेड सोबत उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते.
आम्ही एका विचाराने एकत्र आलो आहोत, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. गेले काही दिवस मला अनेक लोक भेटले आणि त्यांनी आपण भारतीय संविधान वाचविण्यासाठी एकत्र येऊया, असे म्हंटल्याचे ठाकरे म्हणाले.
मला संभाजी ब्रिगेडचे शिवप्रेमी विचार पटतात. तसेच मराठ्यांना आतापर्यंत दुहिचा श्राप गाडत आला आहे. आपण एकत्र येऊन नवीन इतिहास घडवू, या दुहिच्या शापाल गाडून टाकू, असे ठाकरे यावेळी म्हणाले.
महाराष्ट्रात जे काही घडले आणि घडत आहे, ती महाराष्ट्राची ओळख नाही. ही शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या महाराष्ट्राची ओळख नाही. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, आणि तसे आपण वागले पाहिजे.
तसेच आपला महाराष्ट्र देशाला मार्गदर्शक ठरेल असा आपण त्याला घडवूया. त्यामुळे संभाजी ब्रिगेडचे मी स्वागत करतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! काँग्रेसला मोठा दणका, एका माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा
‘आदित्य ठाकरेंची दिशा चुकली’ या घोषणेमागील ‘दिशा’ कोण? भरत गोगावले म्हणाले,
पाषाण तलाव परिसरात आणि उद्यानात प्रेमी युगुलांना बंदी; जाणून घ्या कारण
आनंद दिघे यांच्या स्मृतिदिनी एकनाथ शिंदे यांनी पोस्ट केली कविता
“पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असता, तर…” उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका