‘अनुराग कश्यपनं मलाही घरी बोलावलं अन् मला म्हणाला…’; आणखी एका बड्या अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल

मुंबई | दिग्दर्शक निर्माता अनुराग कश्यप याच्यावर अभिनेत्री पायलं घोषनं लैं.गिक शो.षणाचा आ.रोप केल्यानंतर चित्रपट सृष्टीत चांगलीच खळबळ उडा.ली आहे. चित्रपट सृष्टीतील काही लोक अनुराग कश्यप याला पाठींबा देत आहेत तर काही लोक अनुरागवर आरो.प करत आहेत. सोशल मीडियावरही अनुरागविषयी चांगल्या वा.ईट अशा भरपूर पोस्ट व्हायरल होत आहेत. अभिनेत्री सैयमी खेरचीही एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

अनुराग कश्यपनं दिग्दर्शित केलेल्या ‘चोक्ड’ चित्रपटात सैयमी खेरनं काम केलं आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी अनुरागनं सैयमी खेरला चित्रपटाच्या कामानिम्मित घरी बोलावलं होतं. सैयमी त्यावेळी अनुरागला भेटायला त्याच्या घरी गेली होती. घरी गेल्यानंतर अनुराग आपल्याबर कसं वागला याचा अनुभव सैयमी खेरनं इंस्टाग्रामवर शेअर केला होता. सैयमीची ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

अनुराग कश्यप यानं मला त्याच्या वर्सोवातल्या घरी पहिल्यांदा भेटायला बोलावलं होतं. यासाठी मी त्याच्या घरी गेले होते. त्याच्या घरी गेल्यावर मी त्याला काय बोलणार यापूर्वीच तो मला म्हणाला की, माझ्यासोबत माझे आई वडील देखील राहतात त्यामुळे काळजी करू नकोस, असा अनुभव सैयमीनं सांगितला आहे.

अनुराग कश्यप याला बॉलिवूडमध्ये बॅ.ड बॉय असं म्हटलं जातं. त्याला महिलांसोबत गै.रवर्तन करणारा ड्र.ग्जी असं म्हटलं जायचं पण त्या दिवशी माझे ते सर्व गै.रसमज दूर झाले, असं सैयमीनं म्हटलं आहे. तसेच सैयमीनं या पोस्टमध्ये अनुरागच्या कौटुंबिक वातावरणाविषयी सुद्धा सांगितलं आहे.

इतर भारतीय लोकांच्या घराप्रमाणेच अनुरागच्या घरात गडबड असते. अनुरागचे आई वडील न्यूज पेपर वाचतात. दारावरची सतत वाजणारी बेल, घरी येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार, घरात इथं तिथं फिरणारी मांजर या सर्व गोष्टी इतर लोकांच्या घराप्रमाणे अनुरागच्याही घरात घडतात. ‘चोक्ड’ प्रदर्शित होईपर्यंत हे सर्व मी अनुभवलं आहे. अनुराग माझा चांगला मित्र आणि मेन्टॉर झाला आहे, असं सैयमीनं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, 2014 साली अनुराग कश्यपनं माझ्यावर ज.बरदस्ती केली होती, असं पायल घोषनं म्हटलं आहे.  अनुराग कश्यप माझ्यासमोर न्यू.ड झाला होता, असं म्हणत अनुरागवर पायलनं अनेक गं.भीर आ.रोप केले आहेत.

तसेच या क्रिएटीव्ह दिग्दर्शकाचा खरा चेहरा सर्वांच्या समोर यावा म्हणून याप्रकरणी कारवाई करण्याची मागणीही पायल घोषनं केली आहे. याप्रकरणी आता पुढे काय घडतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

View this post on Instagram

 

This one is long overdue & very long! The first time I met AK he asked me to come to his Versova house. Before I could say anything, he said, “My parents live with me. You don’t have to worry!”. He was supposed to be the “Bad Boy of Bollywood”. His life according to the outside world was “riddled with drugs, women & vices.” The truth, I later learnt, was COMPLETELY the opposite. It was a typical chaotic Indian household. Parents looking for a newspaper, the doorbell constantly ringing, Shrilalji furiously cooking for the increasing guests, a cat strutting around & AK looking for just one quiet corner in his own home. From the time he offered me Choked (sitting next to me at MAMI) to the date of release, it took three years. That’s when I really got to know the man. He became a friend, mentor & sounding board. With him you know you get the whole truth. When he loves your work he jumps, dances, cries & expresses joy; if he doesn’t he just says it. The man has no filters. That is perhaps both his boon & his bane. He loves his whiskey; which I keep nagging him to reduce (instead increase his exercise!). He has a child-like innocence & open-heartedness that is seldom seen in today’s times. He’s so busy playing agony aunt in other people’s lives that perhaps, he forgets about his own. That’s AK for you. It’s always other people before himself. It’s rare to have people through your difficulties. It’s even rarer to have people who truly feel happy for you. Today, when the people who dismissed me three years ago call up lauding my performance, there’s no one happier & prouder than AK. Thank you for believing in me @anuragkashyap10 Thank you for making me believe in myself again!

A post shared by Saiyami Kher (@saiyami) on

महत्त्वाच्या बातम्या-

दीपिका पदुकोनला अ.टक होऊ शकते का?, उज्जल निकम म्हणतात…

आपल्या साडीचा पदर खाली पाडून तिने अनुरागकडे…’; दिग्दर्शकाचा धक्कादायक खुलासा

2 चेंडू, 4 षटकार आणि 27 धावा; जोफ्रा आर्चरनं शेवटच्या षटकात काय करामत केली?

ड्र.ग्ज कनेक्शन : दीपिका पादुकोणनंतर आता या बड्या अभिनेत्रीचं नाव समोर, चौकशी होणार!

अवघ्या 6 वर्षांत मुकेश अंबानींच्या मुलीनं करुन दाखवलं; मिळवलं ‘हे’ प्रतिष्ठेचं स्थान!