‘…त्यानं मला उद्ध्वस्त केलं’ ‘या’ अभिनेत्यासोबतच्या ब्रेकअपवर पहिल्यांदाच बोलली अनुषा दांडेकर

मुंबई| अनुषा दांडेकर ही छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री, होस्ट आणि व्हीजे म्हणून ओळखली जाते. टेलिव्हिजन शो सोबतच ती आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळं देखील नेहमीच चर्चेत असते.

गेल्या वर्षी करण कुंद्रा आणि अनुषा दांडेकरच्या ब्रेकअपच्या मोठ्या चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांवर प्रतिक्रिया देणं सुरुवातीला दोघांनी टाळलं. मात्र जानेवारीमध्ये अनुषाने ब्रेकअप झाल्याचं स्पष्ट केलं. अनुषा दांडेकरने करण कुंद्रासोबतच्या ब्रेकअपबद्दल पुन्हा एकदा खुलासा केला आहे.

अनुषाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत करण कुंद्राने तिला फसवल्याचं म्हंटलं आहे. नुकतच अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चाहत्यांसोबत संवाद साधला. या “आस्क मी एनी थिंग” सेशनमध्ये तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. यावेळी तिने ब्रेकअपबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या.

यावेळी एका युजरने अनुषला विचारलं, “तू ब्रेकअपमधून स्वत:ला कसं सावरलंस .तू आतून खूप खचली असशील” यावर अनुषा म्हणाली, ” तुम्हाला माहितेय मी आतून खचले नव्हते मात्र मी एवढी वर्ष ज्याचा स्विकार केला त्याने मला निराश केलं, मला उद्धवस्त केल्याने मी हादरुन गेले होते.”

पुढे ती म्हणाली, “जेव्हा मी यातून बाहेर पडले आणि मागे वळून पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी माझं स्वत:वरचं प्रेम आणि आत्मसन्मान गमावला आहे. मी स्वत:ला खूप त्रास करून घेतला जे चुकीचं होतं.” असं म्हणत अनुषाने भावनांना वाट मोकळी करून दिली.

त्याचवेळी दुसर्‍या फॅनने अनुषाला विचारले की, याक्षणी तुमची रिलेशनशिप स्टेटस काय आहे? यावर अभिनेत्री म्हणते, मी अशा माणसाचा शोध घेत आहे जो उघडपणे हसतो आणि स्त्रियांसोबत प्रामाणिक आहे. तो आतून आणि बाहेरुन दोन्ही बाजूंनी सारखाच असला पाहिजे.

अनुषा दांडेकर हिच्याबद्दल सांगायचे झाल्यास ती इंडो-ऑस्ट्रेलियन एमटीव्ही वीजे आहे. सोबत गायिका अशीही तिची ओळख आहे. अनुषाचा जन्म ऑस्ट्रेलियातल्या सिडनीमध्ये झाला. देल्ही बेली, सिटी ऑफ गोल्ड आणि एंथोनी कौन है सारख्या चित्रपटात तिने अभिनय केला आहे.

अनुषा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. आपले नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Anusha Dandekar (@vjanusha)


महत्वाच्या बातम्या – 

स्टेजवर डान्स करता-करता चिमुकली चक्क झोपी गेली अन्…,…

‘कोरोना लस घेतल्याचे कार्ड दाखवा आणि एक बियर मोफत…

शीतपेय दिले नाही म्हणून तरूणानी असं काही केलं की, ऐकूण…

कोरोना लसींवरचे राजकारण थांबवा म्हणत ‘या’…

डोळ्याखाली दुखापत होऊनही विराट खेळत राहिला! पाहा काळजाचा…