बॉयफ्रेंडसोबत फोटो शेअर करत, अमिरची लेक आयरा म्हणाली…

मुंबई | बाॅलिवूडचा अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान सध्या खूप चर्चेत आहे. त्याचबरोबर आयरा खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेली पहायला मिळते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. यातच ती आता पून्हा एका कारणासाठी चर्चेत आली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून आमिरच्या मुलीने आपल्या डिप्रेशन आणि रिलेशनशिपविषयी उघडपणे भाष्य केले होते. आता ती एका वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आली आहे. आयरा आपल्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटो सोशल मीडियावर सतत टाकत असते.

असाच त्या दोघांचा एक फोटो सोशल मीडीयावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे. व्हायरल होत असलेल्या फोटो आयरा आणि तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे याचा आहे. त्यामध्ये आम्ही लॉकडाऊनसाठी तयार असल्याचं लिहीलं आहे.

आयरा आणि तिचा बॉयफेंड नुपूर यांचा फोटो ‘entnetwrk’ या यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवर पोस्ट केला आहे. या पोस्टला अनेक वेगवेगळ्या कमेंटही येत आहेत.

तसेच आयराने आपली आई रिना दत्ता हिच्यासोबत नुपूरला भेटवले आहे. त्या दोघांची ओळखही करून दिली आहे. रिनाला नुपूर खूप आवडला आहे. तिला त्या दोघांच्या नात्याबद्दल कोणतीही अडचण नाही. तसेच काही दिवसांपूर्वी आयरा आपल्या फॅमेली कार्यक्रमातही नुपूरला घेऊन गेली होती.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आयराने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात तिने तिचे खर नाव काय आहे, हे सांगितले होते.

त्या व्हिडीओमध्ये ती म्हणाली की, ‘माझ नाव इरा नाही आयरा आहे. माझ्या मैत्रिणी मला चिडवतात, मला तुम्हाला सांगायचं आहे माझं नाव इरा नाही तर आयरा आहे. आय म्हणजे डोळे आणि रा, आयरा. तुम्ही सगळेच माझं नाव चुकीचं उच्चार करता त्यामुळे माझ्या मैत्रिणी माझ्यावर हसतात. माध्यमांतही माझं नाव इरा म्हणून घेतलं जातं. पण ते आयरा आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by EntNetwrk (@entnetwrk)

महत्वाच्या बातम्या-

‘…त्यानं मला उद्ध्वस्त केलं’…

स्टेजवर डान्स करता-करता चिमुकली चक्क झोपी गेली अन्…,…

‘कोरोना लस घेतल्याचे कार्ड दाखवा आणि एक बियर मोफत…

शीतपेय दिले नाही म्हणून तरूणानी असं काही केलं की, ऐकूण…

कोरोना लसींवरचे राजकारण थांबवा म्हणत ‘या’…