नवी दिल्ली | आपल्या अदाकारीनं चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अनुष्का शर्मा (ANUSHKA SHARMA) आणि क्रिकेटर विराट कोहली(VIRAT KOHALI) हे दांम्पत्य कायम चर्चेत असतं.
विराट कोहलीच्या पदार्पणापासून विराट इतक्या धावा जगातील कोणत्याच दुसऱ्या फलंदाजानं केल्या नाहीत. विराट आणि अनुष्का हे आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहेत.
अनुष्का शर्मा चित्रपटाच्या माध्यमातून तर विराट कोहली क्रिकेटच्या माध्यमातून सतत व्यस्त असतात. दोघेही सतत कामानिमीत्त दौऱ्यावर असतात. अशात आरोग्याकडं दुर्लक्ष होणं हे स्वाभाविक आहे.
अशातच आता अनुष्का शर्माला काही वर्षांपासून बल्जिंग डिस्क या आजाराचा त्रास जाणवत असल्याचं समोर आलं आहे. परिणामी विराट कोहलीच्या चिंतेत भर पडत आहे. हा आजार सतत बसून किंवा एकाच पोझिशनमध्ये जास्त काळ राहिल्यानं होतो, असं डाॅक्टरांचं म्हणणं आहे.
अनुष्काचा हा आजार काही महिन्यांपुर्वी थोड्याप्रमाणात कमी झाला होता. पण बाळांतपणानंतर पुन्हा या आजारानं डोकं वर काढल्याचं पहायला मिळत आहे. परिणामी सध्या विराट कोहली कुटुंबाकडे लक्ष देत आहे.
अनुष्का आणि विराटला काही महिन्यांपूर्वीच एक गोंडस मुलगी झाली आहे. परिणामी सध्या दोघेही या मुलीचा सांभाळ करण्यावर जास्तीत जास्त लक्ष देत आहेत.
अनुष्काच्या या आजारापणामुळं सध्या विराट अधिकाधिक प्रमाणात अनुष्का आणि मुलीची काळजी घेण्यावर भर देत आहे. डाॅक्टरांच्या सल्ल्यानूसार सध्या अनुष्काला आरामाची गरज आहे.
काही दिवसांपूर्वीच विराट कोहलीनं भारतीय टी ट्वेंटी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. यासोबतच आरसीबीच्या कर्णधारपदाचा देखील राजीनामा कोहलीनं दिला आहे.
विराटच्या राजीनाम्यामागं भारतीय संघातील परस्पर वाद आहे अशा अफवा पसरल्या होत्या पण विराटनं त्याच्या कुटुंबासोबत जास्त वेळ घालवता यावा यासाठी राजीनामा दिल्याचं आता बोललं जात आहे.
दरम्यान, अनुष्क शर्मा सध्या चित्रपटांच्या शुटींगसाठी सुद्धा जास्त प्रमाणात बाहेर जात नाही. आपल्या तब्येतीची जास्तीत जास्त काळजी घेण्यावर अनुष्काचा भर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
घोटाळ्यांवरुन गदारोळ सुरु असताना आणखी एका 100 कोटींच्या घोटाळ्याचा दावा
समीर वानखेडेंची बाजू भक्कम, ॲड. प्रकाश आंबेडकरांनी दिला मोठा दाखला
‘…आता हे सहन होत नाही’; अमृता फडणवीसांचं नवं गाणं सोशल मीडियावर ट्रोल
“कृषी कायदे मागे घेतल्यानंतर चंद्रकांत पाटलांना शोक असेल तर शोकसभा घेऊ”
भारताला ‘विश्वगुरु’ बनवण्यासाठी मोहन भागवतांनी दिलं ‘हे’ मंत्र