“बैल कितीही आडमुठा असला तरी शेतकरी आपलं शेत नांगरतोच”

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदींच्या या घोषणानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

काहींनी पंतप्रधानांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर, कायदे मागे घ्यायला इतका उशिर का केला, असा सवालही काहींनी उपस्थित केला आहे. तसेच विरोधकांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आता मोदींना जोरदार टोला लगावला आहे. बैल कितीही आडमुठा असला तरी शेतकरी आपलं शेत नांगरतोच. जय जवान जय किसान, असं म्हणत राऊतांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान मोदींनी मृत्युमुखी पडलेल्या 700 शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची माफी मागावी. त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करावी. तसंच लाल किल्ला हिंसाचारासह शेतकऱ्यांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणीही संजय राऊत यांनी केली आहे.

गेल्या दीड वर्षापासून देशातील शेतकरी विशेषतः पंजाब, हरियाणाचा शेतकरी तीन कृषी कायदे, काळे कायदे याविरुद्ध संघर्ष करतोय, आंदोलन करतोय. सरकारची भूमिका पहिल्यापासून आठमुठेपणाची होती, अशी टीका राऊतांनी केलीये.

शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे पूर्णपणे त्यांनी दुर्लक्ष केलं. या संपूर्ण काळात 450 च्या आसापास शेतकऱ्यांचे मृत्यू झाले, आत्महत्या झाल्या. लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडून मारण्यात आलं. लाठ्याकाठ्या वापरण्यात आल्या. प्रचंड दबावाचं राजकारण करण्यात आलं, असंही ते म्हणाले.

शेतकऱ्यांना आतंकवादी, पाकिस्तानी, खलिस्तानी अशा प्रकारच्या उपमा देण्यात आल्या. पण शेतकऱ्यांनी जी भूमिका घेतली ती इतकी परखड आणि अतिशय स्पष्ट होती की देशातील शेतकऱ्यांच्या भावनाही शेतकऱ्यांच्या पाठिशी राहिल्या आणि अखेर आज पंतप्रधानांना तीन काळे कायदे मागे घ्यावे लागले, असंही राऊत म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधानांनी सात वर्षात पहिल्यांदा देशातील जनतेचा आवाज ऐकला. पहिल्यांदा त्यांनी मन की बात ऐकली, असा टोलाही त्यांनी लगावलाय.

दिल्लीत अनेक शेतकऱ्यांचा मृत्यूही झाला. एक वर्षापूर्वीच ऐकलं असतं तर अनेकांचा जीव वाचला असता, असं मत राऊतांनी व्यक्त केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या- 

घोटाळ्यांवरुन गदारोळ सुरु असताना आणखी एका 100 कोटींच्या घोटाळ्याचा दावा 

समीर वानखेडेंची बाजू भक्कम, ॲड. प्रकाश आंबेडकरांनी दिला मोठा दाखला 

‘…आता हे सहन होत नाही’; अमृता फडणवीसांचं नवं गाणं सोशल मीडियावर ट्रोल 

“कृषी कायदे मागे घेतल्यानंतर चंद्रकांत पाटलांना शोक असेल तर शोकसभा घेऊ” 

भारताला ‘विश्वगुरु’ बनवण्यासाठी मोहन भागवतांनी दिलं ‘हे’ मंत्र