नवी दिल्ली | Apple कंपनीच्या iphoneचं आपल्याकडे जवळ-जवळ सर्वांनाच वेड आहे. iphoneचे अनोखे फिचर्स त्याला इतर मोबाईलपेक्षा वेगळे बनवतात. कदाचित त्यामुळेच iphone खरेदी करण्याची अनेकांची इच्छा असते.
सिमकार्डशिवायही आपण एखाद्याला कॉल करू शकतो याची कदाचित आपण कल्पनाच केली असेल. पण Apple हीच कल्पना सत्यात उतरवण्याच्या तयारीत आहे.
Apple आता असा iphone लाँच करणार आहे ज्यात सिमकार्डसाठी कोणताही स्लॉट नसेल. हा नवा iphone ई-सिमवर चालणार आहे. सिमकार्ड स्लॉटशिवाय येणारा हा कदाचित पहिलाच फोन असेल.
कंपनी त्यांच्या iphone 15 या सिरीजमध्ये हे नवीन फिचर अपग्रेड करण्याची शक्यता आहे. पण हा नवा iphone खरेदी करण्यासाठी युजर्सना बरीच वाट पाहावी लागणार आहे.
Apple 2023 मध्ये त्यांची iphone 15 सिरीज लाँच करणार असल्याची माहिती आहे. कंपनी त्यांचे iphone सिमकार्डशिवाय उपलब्ध करून देणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. यापूर्वी Apple Inc ने त्यांचे iphone XR, iphone XS आणि iphone XS Max हे ई-सिमसह लाँच केले होते.
iphone 15 संबंधित एका ब्लॉगनुसार iphone 15 मध्ये सिमकार्डसाठी कोणताही फिजिकल स्लॉट नसेल. हा फोन पुर्णत: ई-सिम तंत्रज्ञानावर अवलंबून असणार आहे. तर या नव्या फोनमध्ये दोन ई-सिम असणार आहेत.
ई-सिममुळे ऑपरेटर बदलले तर सिमकार्ड बदलण्याची गरज नाही. शिवाय हे वर्च्युअल सिम असल्याने खराब होण्याची शक्यता नाही. त्यामुळे फोन फुटला, पाण्यात पडला तर त्याचा ई-सिमवर काहीच परीणाम होणार नाही.
ई-सिममुळे तुम्हाला बाहेरचे कोणतेही सिमकार्ड वापरण्याची गरज नाही. हे वर्च्युअल सिमकार्ड प्रत्यक्ष सिमकार्ड सारखे दिसते. शिवाय त्याचे कामही प्रत्यक्ष सिमकार्ड प्रमाणेच आहे.
भारतात सध्या एअरटेल, रिलायन्स जिओ, व्होडाफोन आणि आयडिया त्यांच्या युजर्सना ई-सिम या आधुनिक फिचरची सुविधा देत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
डाॅ. रवी गोडसे म्हणतात, “Omicron म्हणजे Nonsense”
अफगाणिस्तानात महिलांचे हाल; तालिबान्यांनी घातल्या ‘या’ जाचक अटी
लहान मुलांचंही लसीकरण होणार, अशी करा तुमच्या मुलांची नोंदणी
राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार?, शरद पवार म्हणाले…