शिवसेनेला आणखी एक मोठा झटका, अर्जुन खोतकर शिंदे गटात सामील?

मुंबई | एकनाथ शिंदेंच्या बंडाळीमुळे शिवसेना मुळापासून हादरली आहे. दोन तृतीयांश आमदारांपाठोपाठ अनेक आजी-माजी नगरसेवक, जिल्हाप्रमुख व खासदारांनीही शिवसेनेकडे पाठ फिरवली.

शिंदे गटाच्या बंडाळीमुळे स्वाभाविकच शिवसेनेत दोन गट पडले आहेत. शिवसेेनेतील या ऐतिहासिक बंडखोरीमुळे सेनेला मोठं भगदाड पडलं आहे.

शिवसेनतील गळती अजूनही चालूच असून आता मराठवाड्यातून शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर शिंदे गटात सामील झाले असल्याची चर्चा आहे.

अर्जुन खोतकर देखील शिंदे गटात सामील झाले तर उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा झटका असणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार खोतकरांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिल्याचं म्हटलं जात आहे.

नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात अर्जुन खोतकरांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याचं देखील म्हटलं जात आहे.

दोन दिवसांपूर्वीही खोतकर शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा रंगत होती. मात्र, मी शिवसैनिक असून नेहमी शिवसेनेतच राहणार असं म्हणत त्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला होता.

माझ्या बाबतीत काही पक्षांतराच्या बातम्या आल्या. पण त्या केवळ अफवा आहेत, असं स्पष्टिकरण अर्जून खोतकर यांनी दिलं होतं.

दरम्यान, शिंदेंच्या मध्यस्तीमुळे राजकारणातील कट्टर वैरी असलेले रावसाहेब दानवे व खोतकरांमध्ये दिलजमाई झाल्याचं पाहायला मिळालं. तर मी माझ्या कामामुळे तिथे गेलो होतो, आजची भेट म्हणजे निव्वळ योगायोग, असं स्पष्टीकरण खोतकरांनी दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

हल्लाबोल, आसूड, गोप्यस्फोट; संजय राऊतांनी शेअर केला उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा टीझर

‘अब राजा वही बनेगा जो हकदार होगा’, मनसे नेत्याच्या सूचक ट्विटने खळबळ

“राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जंजिरमध्ये अडकलेल्यांनी खंजीरची भाषा करू नये”

‘गेले ते बंडखोर नाही तर हरामखोर’, उद्धव ठाकरे बंडखोरांवर बरसले

‘मनसे म्हणजे एक आमदाराची अगरबत्ती’, भोगामंत्री म्हणत दीपाली सय्यद यांनी पुन्हा मनसेला डिवचलं