मुंबई | काही जणांनी माझी प्रकृती सुधारणार नाही यासाठी काही जणांना देव पाण्यात ठेवले होते. तेच लोकं पक्ष बुडवायला निघाले होते, असा गंभीर आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केला आहे. उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांची भूमिका मांडली.
तुम्ही इस्पितळात गुंगीत असतानाच तुमचं सरकार पाडण्याचा, पक्ष फोडण्याचा प्रयत्न होत होता?, असा प्रश्न राऊतांनी उद्धव ठाकरेंना विचारला. यावर यावर मी बोलू की नाही?? असा मला प्रश्न पडलाय. कारण माझ्या या अनुभवातून मला कुठलीही सहानुभूती नकोय. तो फार वाईट अनुभव होता, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.
मी ज्यावेळी गुंगीत होतो, रुग्णालयात होतो त्यावेळी काही जणांनी बाहेर हालचाली सुरु केल्या होत्या, काही जणांनी माझी प्रकृती सुधारणार नाही यासाठी काही जणांना देव पाण्यात ठेवले होते. तेच लोकं पक्ष बुडवायला निघाले होते, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे.
मी कुटुंबप्रमुख, पक्ष प्रमुख शस्त्रक्रिया झाल्यानंतर माझी हालचाल होत नव्हती त्या काळामध्ये ह्यांच्या हालचाली जोरात होत्या. नाही म्हटलं तरी हे वेदनादायी सत्य आयुष्यभर राहणार आहे. की जेव्हा मी तुम्हाला जबाबदारी दिली होती पक्ष सांभाळण्याची, दोन नंबरचं पद दिलं होतं. पक्ष सांभाळायला म्हणून पूर्ण विश्वास दिला होता. तो विश्वासघात तुम्ही केला, असा आरोप उद्धव ठाकरेंना सांगितलं.
दरम्यान, मला त्याचा वारंवार अनुभव येतोय. शिवसेना एक तळपती तलवार आहे. म्यानेत ठेवल्यास ती गंजते. त्यामुळं ती तळपलीच पाहिजे. तलवार तळपण म्हणजे संघर्ष आला, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.
शिवसेना आणि ठाकरेंचं नात तोडण्याचा प्रयत्न केला जातोय.तुम्ही आज ज्या संघर्षमय कालखंडातून जाताय त्याची अपेक्षा केली होती?, असा सवाल संजय राऊत यांनी केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसेना आणि संघर्ष पाचवीला पुजलं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
शिवसेनेला आणखी एक मोठा झटका, अर्जुन खोतकर शिंदे गटात सामील?
हल्लाबोल, आसूड, गोप्यस्फोट; संजय राऊतांनी शेअर केला उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा टीझर
‘अब राजा वही बनेगा जो हकदार होगा’, मनसे नेत्याच्या सूचक ट्विटने खळबळ
“राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जंजिरमध्ये अडकलेल्यांनी खंजीरची भाषा करू नये”
‘गेले ते बंडखोर नाही तर हरामखोर’, उद्धव ठाकरे बंडखोरांवर बरसले