उत्सुकता संपली! ‘बिग बॉस मराठी 4’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, पहिला प्रोमो समोर

मुंबई | बिग बॉस मराठी शो काही कालावधीतच लोकप्रिय झाला. बिग बॉस मराठीचे तिन सीझन यापूर्वी प्रदर्शित झाले असून आता लवकरच चौथा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बिग बॉस मराठी शो जितका लोकप्रिय आहे तितकाच वादग्रस्तही. मात्र तरीही शोचे पहिले तिनही सीझन लोकप्रिय ठरले.

तीन यशस्वी सीझन नंतर बिग बॉस मराठी चौथ्या सीझनसोबत प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालं आहे. कलर्स मराठीने चौथ्या सीझनचा प्रोमो शेअर केला आहे.

मराठी मनोरंजनाचा बिग बॉस येतोय लवकरच.. आपल्या कलर्स मराठीवर, असं म्हणत कलर्स मराठीने चौथ्या सीझनचा पहिला प्रोमो शेअर केला आहे.

बिग बॉस मराठीच्या पहिल्या तीन सीझनचं सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केलं होतं. मात्र कर्करोगामुळे त्यांनी तिसऱ्या सीझनच्या काही भागातून ब्रेक घेतला होता. त्यामुळे चौथ्या सीझनची धुरा महेश मांजरेकरच सांभाळणार की होस्ट म्हणून नवीन चेहरा पाहायला मिळणार यासाठीही प्रेक्षक उत्सुक आहेत.

तिसऱ्या सीझनमध्ये मराठी कलाविश्वातील अनेक ओळखीचे चेहरे पबिग बॉसच्या घरात पाहायला मिळाले होते. त्यामुळे यंदाच्या सीझनमध्ये कोणते सेलिब्रिटी पाहायला मिळणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, अनिता दाते, शुभांगी गोखले, मृणाल दुसानीस, अक्षय केळकर, रूचिता जाधव, अभिजीत आमकर, किरण माने, निखील चव्हाण हे सेलिब्रिटी बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात दिसू शकतात. मात्र, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

 

महत्त्वाच्या बातम्या-

हल्लाबोल, आसूड, गोप्यस्फोट; संजय राऊतांनी शेअर केला उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा टीझर

‘अब राजा वही बनेगा जो हकदार होगा’, मनसे नेत्याच्या सूचक ट्विटने खळबळ

“राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जंजिरमध्ये अडकलेल्यांनी खंजीरची भाषा करू नये”

‘गेले ते बंडखोर नाही तर हरामखोर’, उद्धव ठाकरे बंडखोरांवर बरसले

‘मनसे म्हणजे एक आमदाराची अगरबत्ती’, भोगामंत्री म्हणत दीपाली सय्यद यांनी पुन्हा मनसेला डिवचलं