पितृपक्षानंतरच सेना-भाजप युतीची घोषणा???

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सध्या तरी भाजप आणि शिवसेनेची भाषा युती होणार अशीच आहे. मात्र या फॉर्म्युल्याबद्दल जाहीरपणे दोन्ही पक्षांचे नेते बोलायला तयार नाहीत. आता पितृपक्षानंतरच युतीची घोषणा होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या 29 सप्टेंबरला युतीची घोषणा करण्याची शक्यता आहे. याच वेळी विधानसभेचा फॉर्म्युलाही ठरणार असल्याचं बोललं जात आहे.

लोकसभा निवडणुकांप्रमाणे विधानसभेचा फॉर्म्युला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह ठरवणार आहेत. हा फॉर्म्युला मुंबईत ठरणार आहे. युतीच्या घोषणेबाबत सध्या पितृपक्षाचं कारण असलं, तरीही युतीचे घोडं हे जागा वाटपावर अडकलेलं पाहायला मिळत आहे.

येत्या 29 तारखेला अमित शाह मुंबईत येणार आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच आता जागा वाटपाचा फॉर्म्युला शाहाचं ठरवणार असल्याची दाट शक्यता आहे. 

दरम्यान, शिवसेना 50-50 च्या फॉर्म्युलावर अडून बसली आहे. तर भाजप 126 पेक्षा जास्त जागा शिवसेनेला द्यायला तयार नाही.

महत्वाच्या बातम्या-