“गृहमंत्री अमित शहा आणि लष्करप्रमुख मनोज नरवणेंना अटक करा”

नवी दिल्ली | देशाचे गृहमंत्री आमित शहा आणि भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल मनोज नरवणे हे दोन व्यक्ती देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचे निर्णय घेतात. परिणामी त्यांच्यावर जगाची नजर असते.

भारत आणि पाकिस्तानमध्ये जम्मू काश्मीर या भारताच्या अविभाज्य भागावरून जोरदार वाद आहेत. पृथ्वीवरील नंदनवन ही उपमा लाभलेलं काश्मीर खोरं दहशतवादामुळं रक्तरंजीत झालं आहे.

पाकिस्तान जागतिक स्तरावर भारताविरोधी भूमिका घेण्यात पटाईत आहे. जम्मू काश्मीर आमचाच भाग असल्याचं पाकिस्ताननं अनेकदा जागतिक व्यासपिठावर म्हटलं आहे.

अशात आता पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय समुदायासमोर खळबळ माजवणारी मागणी केली आहे. भारतीय लष्कराचे प्रमुख मनोज नरवणे आणि गृहमंत्री अमित शहा यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

जम्मू काश्मीरमध्ये कार्यकर्ते, पत्रकार आणि नागरिकांच्या नुकसानीमध्ये या दोन्हींसह भारतीय लष्कराचा हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी सध्या तणाव वाढण्याची शक्यता आहे.

ब्रिटनच्या मेट्रोपाॅलिटन पोलिसांच्या युद्ध गुन्हे शाखेच्या युनिटला याबाबत कथित पुरावे सादर करण्यात आले आहेत. लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा सदस्य झिया मुस्तफा यानं ही या अटकेची मागणी केली आहे.

झिया मुस्तफानं जम्मू काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी कारवाया पार पाडल्या आहेत. काश्मीरमधील नदीमार्ग हत्याकांडाचा खरा सुत्रधार झिया आहे. त्याला 2003 मध्ये जम्मू काश्मीर पोलिसांनी अटक केली होती.

स्टोक व्हाईट या ब्रिटनस्थित कायदे कंपनीनं 40 पानी अहवाल सादर केला आहे. या अहवालात भारतीय सैन्याकडून काश्मीरमध्ये केल्या जात असलेल्या कारवाईबद्दल सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, भारताच्या सुरक्षेत महत्त्वाच्या असणाऱ्या दोन व्यक्तींबद्दल अशाप्रकारची मागणी केल्यानं सध्या हे प्रकरण जागतिक स्तरावर तापण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या- 

‘…अशा नामर्द माजोरड्या वृत्तीला वेळीच चिरडलं पाहिजे’; चित्रा वाघ संतापल्या 

संतापजनक! गर्भवती वनरक्षक महिलेला माजी सरपंचाकडून मारहाण, पाहा व्हिडीओ  

“देवेंद्र फडणवीस यांची अवस्था कुणी खुर्ची देता का खुर्ची अशी” 

‘…तर कामावरून काढून टाकलं जाईल’; सरकारचे कर्मचाऱ्यांना कडक निर्देश 

यशोमती ठाकूर यांनी केलेल्या टीकेला बच्चू कडूंचं प्रत्युत्तर, म्हणाले ‘भूत लागल्या प्रमाणे…’