मुंबई | ‘मुलगी झाली हो’ या मराठी सिरीयलमधून अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांना काढून टाकण्यात आलं होतं. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून किरण मानेंच्या समर्थनात पोस्ट व्हायरल होऊ लागल्या.
किरण माने यांना राजकीय वैमन्स्यातून काढून टाकण्यात आलं, असा आरोप करण्यात येत होता. त्यावरून फक्त मनोरंजन नाही तर राजकीय वर्तुळात देखील चांगलाच वाद पेटला होता.
हा वाद आणखी वाढल्याचं पाहता, मुलगी झाली हो, या मालिकेतील इतर कलाकार पुढे आले आणि किरण माने यांच्यावर गैरवर्तवणुकीचा आरोप केला होता. त्यावरून आता वातावरण चांगलंच तापलेलं असतानाच आता किरण माने यांची पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
किरण माने यांनी लिहिलेल्या एका पोस्टमधून त्यांना नवीन चित्रपट मिळाला असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. ‘आनंद वो…निव्वळ आनंद… नविन भन्नाट जबराट नादखुळा भूमिका’, असं किरण माने फेसबूक पोस्टमधून म्हणतात.
आपन वास्तवात ज्या विचारधारेची ‘भूमिका’ घेत असतो…लढत असतो..त्याचवेळी मोठ्या पडद्यावरबी त्याच विचाराचा धागा असनारी ‘भूमिका’ मिळावी, यासारखं दूसरं समाधान नाय भावांनो, असं किरण माने म्हणाले आहेत.
शुटिंग सुरू झाल्यापासून फेसबुकवर किरण माने, न्यूज चॅनलवर किरण माने, पेपरमध्ये किरण माने, सेटवर आलं की समोर किरण माने आणि कॅमेरा लेन्समध्ये पाहिलं तरी किरण माने होतं, असंही ते यामध्ये म्हणत आहेत.
रावरंभा असं या आगामी चित्रपटाचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. अपूर्वा नेभळेकर,ओम भूतकर, संतोष जुवेकर, कुशल बद्रिके हे कलाकार या चित्रपटात असणार असल्याची माहिती समोर आली आहे.
अनुप जगदाळे हा आगामी चित्रपट दिग्दर्शित करत आहेत. तर शशिकांत पवार या चित्रपटाचे निर्माते आहेत. त्याचवेळी त्यांनी आपली बाजू मांडण्याचा देखील प्रयत्न केला आहे.
मी न्यायासाठी लढा देत असतानाच, दुसर्या बाजूला अशा व्यक्तीची भूमिका करत होतो ज्यानं परक्या व्यक्तीला न्याय मिळावा म्हनून स्वत:चा जीव दिला, असंही ते म्हणाले आहेत.
मुहूर्त होऊन माझं पहिलं शेड्यूल नुकतंच संपलं आहे. प्रतिक्षा पुढच्या शेड्यूलची, असंही त्यांनी सांगितलं. तोपर्यंत न्यायाची दूसरी लढाई सुरू असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या –
“गृहमंत्री अमित शहा आणि लष्करप्रमुख मनोज नरवणेंना अटक करा”
‘…अशा नामर्द माजोरड्या वृत्तीला वेळीच चिरडलं पाहिजे’; चित्रा वाघ संतापल्या
संतापजनक! गर्भवती वनरक्षक महिलेला माजी सरपंचाकडून मारहाण, पाहा व्हिडीओ
“देवेंद्र फडणवीस यांची अवस्था कुणी खुर्ची देता का खुर्ची अशी”
‘…तर कामावरून काढून टाकलं जाईल’; सरकारचे कर्मचाऱ्यांना कडक निर्देश