गोळी मारा म्हणणाऱ्या अनुराग ठाकुरांना अटक करा; #ArrestAnuragThakur ट्वीटरवर ट्रेंड

मुंबई |  CAA आणि NRC कायद्याविरोधात आणि समर्थनार्थ संपूर्ण देशात मोर्चे निघत आहेत. यामध्ये सरकार आणि आंदोलकांमध्ये जोरदार घमासान सुरू आहे. केंद्रिय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आंदोलनकर्त्यांवर टीका करताना त्यांना गोळ्या घाला, असं वक्तव्य केलं होतं आणि आज दिल्लीतल्या जामियामध्ये आंदोलन सुरू होण्याअगोदर एका तरूणाने आंदोलनकर्त्यांवर गोळी चालवली. यानंतर आता अनुराग ठाकुरांना अटक करा, असा ट्वीटरवर ट्रेंड सुरू झाला आहे.

अनुराग ठाकूर हे गोळी मारा म्हटल्यानेच गोपाल वर्मा याने गोळीबाराचं पाऊल उचललेलं आहे, असं काही ट्वीटर युझर्सचं म्हणणं आहे तर भाजप नेत्यांच्या अशा वक्तव्यांनी त्याने हे कृत्य केलंय. त्यामुळे ठाकूर यांना अटक झालीच पाहिजे, असं काही ट्वीटर युझर्सने म्हटलं आहे.

दिल्लीतील जामिया विद्यापीठात CAA विरोधी आंदोलन सुरू असताना गोपाल वर्मा नामक तरूणाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गोळीबारामध्ये एक आंदोलक जखमी झाला असून त्याला रूग्णालयामध्ये दाखल केलं आहे.

दुसरीकडे दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांचं नाव स्टार प्रचारक यादीतून हटवण्याचा आदेश निवडणूक आयोगान भाजपला दिला आहे.

 

 

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

-भाजपने नेमलेले 19 साखर कारखान्यांवरचे संचालक हटवले; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

-भाजपचे नेतेच गोळी मारा म्हणत असतील तर हे होणारच; प्रियांका गांधींचं टीकास्त्र

-जितेंद्र आव्हाड आणि संजय राऊत यांच्या मुखातून शरद पवार तर बोलत नाहीत ना??- आशिष शेलार

-…..हा मार्ग देशाला अराजकतेकडे घेऊन जात आहे; जामिया गोळीबारावर थोरात यांचं मत

-एका नगरसेवकाने घेतली दुसऱ्या नगरसेवकाची पप्पी; कोल्हापूर महापालिकेतला प्रकार