पंतप्रधान मोदी भगवान राम तर अमित शहा हनुमान; भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य

नवी दिल्ली |  भाजपच्या काही नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या कामाचं कौतुक करताना त्यांची तुलना देवदेवतांशी तसेच महापुरूषांशी केलीये. आता मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मोदी आणि शहांची तुलना भगवान राम आणि हनुमानाशी केली आहे.

जर पंतप्रधान मोदी भगवान राम असतील तर अमित शहा हनुमान आहेत, असं वक्तव्य शिवराज सिंह चौहान यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून आता वादंग उठण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वीचं भाजप नेते गोयल यांनी मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली होती. याचे पडसाद महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात उमटले होते. आता चौहान यांच्या वक्तव्यावर काँग्रेस जोरदार टीका करण्याची शक्यता आहे.

जगात अशीच अशी कुठलीच शक्ती नाहीये की जी CAA अंमलबजावणी रोखू शकेल. नरेंद्र मोदी हे असे पंतप्रधान आहेत की जे कोणत्याही धमकीला घाबरत नाहीत, असंही ते म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-गोळी मारा म्हणणाऱ्या अनुराग ठाकुरांना अटक करा; #ArrestAnuragThakur ट्वीटरवर ट्रेंड

-भाजपने नेमलेले 19 साखर कारखान्यांवरचे संचालक हटवले; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

-भाजपचे नेतेच गोळी मारा म्हणत असतील तर हे होणारच; प्रियांका गांधींचं टीकास्त्र

-जितेंद्र आव्हाड आणि संजय राऊत यांच्या मुखातून शरद पवार तर बोलत नाहीत ना??- आशिष शेलार

-…..हा मार्ग देशाला अराजकतेकडे घेऊन जात आहे; जामिया गोळीबारावर थोरात यांचं मत