मुंबई | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने अनेक देशात थैमान घालायला सुरूवात केली आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचा भारतातील 14 राज्यात शिरकाव झाल्याने दहशत निर्माण झाली आहे.
ओमिक्रॉनचे सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा वाढत असल्याने सगळीकडे भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
राज्यात सर्वात जास्त कोरोनाबाधित रूग्ण मुंबईत आढळून आले आहेत. कोरोनाच्या वाढत्या रूग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कलम 144 लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर आजपासून पुढच्या शुक्रवारपर्यंत अर्थात 30 डिसेंबरपासून ते 7 जानेवारीपर्यंत मुंबईत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
मुंबईत लागू करण्यात आलेल्या नियमानूसार, पाचपेक्षा जास्त व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमता येणार नाही. सोबतच मोकळ्या किंवा बंद जागेत नवीन वर्षानिमित्त पार्टी, स्नेहसमारंभ किंवा कोणत्याही उपक्रमाच्या आयोजनावर बंदी घालण्यात आली आहे.
30 डिसेंबर ते 7 जानेवारी यादरम्यान, हॉटेल, रेस्टॉरंट, बार, पब, क्लब, रिसॉर्टसारख्या मोकळ्या किंवा बंदिस्त जागेवर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
राज्यातील एकुण कोरोना रूग्णसंख्येपैकी 63 टक्के रूग्ण हे मुंबईत आढळून आले आहेत. मुंबईतील कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
मुंबईत कोरोनाबाधितांचे प्रमाण 1 टक्क्यावरून 3 टक्क्यांवर जाऊन पोहोचले आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाचा वाढता फैलाव बघता मुंबई कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी होणारी गर्दी व कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता मुंबईत 7 जानेवारीपर्यंत 144 कलम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कालीचरणला अखेर अटक!
संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना आणखी एक धक्का; कर्मचाऱ्यांच्या पगारातून…
कोरोना कधी संपणार?; तज्ज्ञांनी दिली दिलासादायक बातमी
‘कोरोनाची त्सुनामी येणार आणि…’; WHO ने दिलेल्या माहितीने जगाचं टेंशन वाढलं
वजन कमी करायचंय?, थंडीच्या दिवसात आहारात करा फक्त ‘या’ सूपचा समावेश