“देवेंद्रजी तुम्ही उद्या मुख्यमंत्री व्हाल आणि भविष्यात पंतप्रधानही व्हाल पण…”

मुंबई | देवेंद्रजी तुम्ही आता विरोधी पक्षनेते आहात, उद्या मुख्यमंत्री व्हाल आणि भविष्यात पंतप्रधानही व्हाल. पण माझी एक अपेक्षा आहे की, शिवाजी महाराजांचे आचारविचार हे लिखित स्वरुपात सामान्यातल्या सामान्य शिवभक्तापर्यंत पोहोचला पाहिजे, अशी अपेक्षा खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे.

चाळीसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), माजी मंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री गिरीष महाजन, खासदार रक्षाताई खडसे यांच्यासह खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला आहे. यावेळी संभाजीराजे बोलत होते.

राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी पण आता महाराष्ट्राची ओळख जपण्याची गरज आहे. त्यासाठी राज्यातील सर्व नेत्यांनी एकत्र येऊन आरक्षणाचा प्रश्न सोडवला पाहिजे, असं आवाहन संभाजीराजेंनी केलं आहे.

शिवाजी महाराजांच्या विचारांमुळे महाराष्ट्राची ओळख दिल्लीत आणि इतिहासात वेगळी आहे. पण महाराजांच्या राज्यात मराठा, ओबीसी व अन्य आरक्षणासाठी आपण आपआपसात भांडत आहोत, या प्रश्‍नांमुळे दिल्लीत खासदारांमध्ये एक वेगळीच चर्चा सुरू असून, महाराष्ट्रात काय चालू आहे? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे, असं संभाजीराजे म्हणालेत.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य लाभले याबाबत फडणवीसांनी आभार व्यक्त केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि ते खऱ्या अर्थाने युगपुरुष होते, असं फडणवीस म्हणाले.

युगपुरुष म्हणजे, जे सामान्यांना जागृत करून त्यांच्याकडून असामान्य काम करवून घेतात. म्हणूनच अठरा पगड जातींना एकत्र करून त्यांनी रयतेचे राज्य प्रस्थापित केले, असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कालीचरणला अखेर अटक! 

कोरोना कधी संपणार?; तज्ज्ञांनी दिली दिलासादायक बातमी

‘कोरोनाची त्सुनामी येणार आणि…’; WHO ने दिलेल्या माहितीने जगाचं टेंशन वाढलं  

कोरोनाचा ‘या’ अवयवावर होतोय गंभीर परिणाम?; धक्कादायक माहिती समोर 

“माझ्यात आणि मोदींमध्ये एकत्र येण्यावर चर्चा झाली होती पण…”