नवी दिल्ली | आगामी गुजरात विधानसभा (Gujarat Assembly Election 2023) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक आणि राष्ट्रीय पक्ष रणांगणात उतरले आहेत. त्यातच आता आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भाजप आणि काँगेस पक्षांवर सडकून टीका केली आहे.
केजरीवाल आता दिल्ली आणि पंजाबनंतर गुजरात या नरेंद्र मोदींच्या राज्यात पक्ष मजबूत करण्यासाठी सर्वसामान्यांसोबत संवाद साधत आहेत. मंगळवारी त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला.
यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांसोबत देखील संवाद साधला आणि त्यांनी काँग्रेसच्या (INC) आरोपांना उत्तरे दिली. काँग्रेस एक संपलेला पक्ष आहे, असे केजरीवाल यावेळी म्हणाले.
पंजाबमधील आप सरकार दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असून, पगारासाठी पैसे नसतानाही गुजरातमध्ये जाहीरातींवर करोडो रुपये खर्च करत आहेत, असा आरोप काँग्रेस पक्षाने केला होता.
भाजप सोनिया गांधींना (Soniya Gandhi) पंतप्रधान करण्याची योजना आखत असल्याचा टोला केजरीवालांनी लगावला. अरविंद केजरीवाल आम आदमी पक्ष भाजपचा मुख्य प्रतिस्पर्धी असल्याचे मानत आहेत.
काही लोकांना राज्यात भाजपचे सरकार नको आहे आणि त्यांना काँग्रेसवा मदत देखील करायची नाही आहे. आपल्याला ती मते मिळवायची आहेत. राज्यात भाजपला आपणच पर्याय आहोत. असा दावा केजरीवाल यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या –
मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; शिर्डी संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त
“…तर हा आशिष शेलार सुद्धा कुरेशी”; आशिष शेलारांचा व्हिडिओ व्हायरल
“…म्हणून मी भगवान गडावर दसरा मेळावा घेणार आहे”; करुणा मुंडे यांचा मोठा दावा
गोळीबार प्रकरणी सदा सरवणकरांवर दादर पोलिसांची मोठी कारवाई
शिवसेना कोणाची खटला: शिंदे गटाची नवीन खेळी, शिवसेना अडचणीत