“दिल्लीकरांसाठी मी जीवन त्यागलं अन् भाजप मला दहशतवादी म्हणतंय याचं फार दु:ख वाटतंय”

नवी दिल्ली |  दहशतवादी आणि नक्षलवादी ज्याप्रमाणं देशाचं नुकसान करतात. रस्त्यांची नासधूस करतात. सरकारी मालमत्तेचं नुकसान करतात तेच काम मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल करत आहेत. ते दहशतवादीच आहेत, असं भाजप खासदार प्रकाश वर्मा म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

भाजप मला दहशतवादी म्हणतंय याचं मला फार दु:ख होतंय, अशा भावना केजरीवालांनी व्यक्त केल्या आहेत. 5 वर्ष दिवस रात्र काम करून दिल्लीला आपण उभं केलं. दिल्लीकरांसाठी आपण सगळ्याचा त्याग केला. राजकारणात आल्यानंतर खूप संकटांचा सामना करावा लागला पण तो सामना मी दिल्लीकरांसाठी केला आणि दु:खाची गोष्ट म्हणजे भाजप मला आज दहशतवादी म्हणतंय, अशी खंत केजरीवालांनी व्यक्त केली.

भाजपने दिल्ली विधानसभा जिंकण्याचा कितीही प्रयत्न केला तरी दिल्लीकर नागरिक यावेळी काम बघूनच मतदान करतील आणि भाजपकडे तर दाखवायला कामच नाहीये, असाही टोला त्यांनी भाजपला लगावला.

दुसरीकडे भाजपचे 200 खासदार, 70 मंत्री अन् 11 मुख्यमंत्री दिल्लीत प्रचाराला येत आहेत. आमच्याकडे ‘अतिथी देवो भवं’ मानलं जातं. विविध राज्यातल्या भाजप नेत्यांनो आता दिल्लीत आलाच आहात तर आपल्यासाठी दिल्ली दर्शनाचं आयोजन केलेलं आहे. अक्षरधाम, लोटस टेम्पल सगळं फिरून घ्या, अशी उपरोधिक टीका केजरीवालांनी भाजपवर केली आहे.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-