“या कागदपत्र मागायला… इथल्याच मातीत दफन केलेल्या वडिलांच्या कब्रस्तानावर घेऊन जातो”

मुंबई |  मोदीजी ज्या दिवशी तुम्ही माझ्याकडे कागदपत्रं मागायला याल त्यादिवशी मी तुम्हाला माझ्या आजोबा आणि वडिलांना दफन केलेल्या कब्रस्तानात घेऊन जाईल आणि सांगेन हीच माझी कागदपत्रं आहेत, असं वक्तव्य एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलं आहे.

मी याच मातीत जन्मालो आलो आहे आणि याच मातीत दफन होईल, अशा शब्दात जलील यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध केला आहे. ते मुंबईत्या नागपाड्यात सीएए आणि एनआरसीविरोधी आंदोलनात बोलत होते.

मोदी-शहा तुम्ही आमच्या प्रामाणिकपणाचे पुरावे मागत आहात. तुम्ही आमच्याकडून मशीद हिसकावून घेतली आम्ही नाराज झालो पण आंदोलन केलं नाही. काश्मिरमध्ये अन्याय केला तरी आम्ही शांत राहिलो. तिहेरी तलाकच्यावेळी तुम्ही शरियतसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केलात. पण आता तुम्ही आम्हाला या देशापासूनच वेगळं करण्याचा प्रयत्न करताय. आता आम्ही शांत बसणार नाही. देशभरात हे आंदोलन असंच सुरू राहिल, असा इशारा जलील यांनी मोदी-शहांना दिला.

आमच्या घरातल्या बुरखाधारी महिला आज रस्त्यावर उतरत आहेत याची तुम्हाला भिती वाटत आहे. जेव्हा हिजाब घातलेल्या महिला घराबाहेर पडतात तेव्हा क्रांती होते, असा इतिहास आहे, असंही जलील म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-“अरविंद केजरीवाल हे दहशतवादीच आहेत”

-“देशद्रोह्यांना बिर्याणी नाही, तर गोळ्या घातल्या पाहिजेत”

-भाजपचे 200 खासदार, 70 मंत्री अन् 11 मुख्यमंत्री दिल्लीच्या प्रचाराला- अरविंद केजरीवाल

-राज ठाकरेंचा एकमेव आमदार उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला

-नवरा देशासाठी शहीद झालाय आणि मुलीला शाळेत साधा प्रवेश मिळत; वीरपत्नीची खंत