मुंबई | अभिनेता शाहरुख खान गेल्या काही दिवसांपासून चित्रपट सृष्टीपासून लांब आहे. यामुळे बॉलिवूडच्या बादशाहला त्याचे चाहते चांगलेच मिस करत आहेत. शाहरुख चित्रपट सृष्टीपासून लांब असला तरी तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो.
शाहरुख तीन मुलांचा पिता आहे. आर्यन, सुहाना आणि अब्राहम अशी शाहरुखच्या मुलांची नावे आहेत. इतर वडिलांप्रमाणे शाहरुखच्या देखील आपल्या मुलांकडून काही अपेक्षा आहेत. एका मुलाखतीत शाहरुखने याविषयी बोलून दाखवलं होतं.
या मुलाखतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलाखतीत शाहरुखला त्याचा मुलगा आर्यन खान विषयी काही प्रश्न विचारण्यात आले होते. यावेळी शाहरुखने त्याला आपल्या मुलाकडून काय अपेक्षा आहेत, हे स्पष्टपणे सांगितलं होतं.
मुलाखतीत बोलताना शाहरुख म्हणाला होता की, आर्यन मोठा झाला की त्याने मुलींना डेट करावे. ज्या काही गोष्टी मी माझ्या लहानपणी करु शकलो नाही त्या सर्व गोष्टी त्याने कराव्यात. ड्रग्ज आणि सेक्सचा अनुभव देखील त्याने घ्यावा.
आर्यन एक वाईट मुलगा बनायला पाहिजे. माझा मुलगा जर एक चांगला मुलगा म्हणून राहिला तर मी त्याला घरातून बाहेर काढेल, असं देखील शाहरुख यावेळी हसत म्हणाला होता.
सध्या व्हायरल होणारा शाहरुखचा हा व्हिडीओ 1997 सालचा आहे. यावेळी नुकताच आर्यन खानचा जन्म झाला होता. आर्यनच्या जन्मानंतर शाहरुखने सीमी ग्रेवालच्या टॉक शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी शाहरुखसोबत त्याची पत्नी गौरी खान देखील होती.
दरम्यान, शाहरुख खानची मुलगी सुहाना खान लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करेल, अशा चर्चा माध्यमांमध्ये चालू आहेत. परंतु तिचा प्रथम चित्रपट कोणता आहे, याबद्दल माहिती समोर आली नाही. सुहानाने अद्याप डेब्यू केला नसला तरी देखील तिच्या फॅन्सची संख्या बरीच आहे.
महत्वाच्या बातम्या-
कचऱ्यावाल्यानी वाचवला चिमुकल्याचा जीव, पाहा अंगाचा थरकाप करणारा व्हिडीओ
शाईनिंग करत स्टंट करायला गेला अन्…,पाहा व्हिडीओ
लग्नात नवरीच्या भावांनी असं काही सरप्राईज दिल की, ते पाहून नवरीला बसला धक्का, पाहा व्हिडीओ
फ्लाइट पकडण्यासाठी चक्क तरूणीनी आली एअरपोटवर बिकनी घालून, पाहा व्हायरल व्हिडीओ