MLC Election | देवेंद्र फडणवीसांच्या खांद्यावर डोकं ठेवताच बावनकुळेंना अश्रू अनावर, फडणवीसही गहिवरले

नागपूर | गेल्या विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांचं तिकीट कापण्यात आलं होतं. परंतु आता विधान परिषदेत बावनकुळे यांनी दणदणीत विजय मिळवला.

निवडणुकीत विजयी झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा गळ्यात हार घालून अभिनंदन केलं. फडणवीसांनी आपल्या गळ्यात विजयाची माळ घातल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

चंद्रशेखर फडणवीसांच्या खांद्यावर डोकं ठेवलं. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. बावनकुळेंना अश्रू अनावर झाल्याचं पाहून फडणवीस यांनाही काही क्षण गहीवरून आलं होतं.

बावनकुळेंच्या डोळ्यातील अश्रू पाहून देवेंद्र फडणवीसही अस्वस्थ झाले होते. हे चित्रं पाहून भाजपचे कार्यकर्तेही काही काळ स्तब्ध झाले होते. त्यानंतर फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधला आणि बावनकुळे यांचं प्रचंड कौतुक केलं.

तीन पक्ष एकत्र आल्यावर विजय होतोच असं नाही. या निकालाने ते सिद्ध केलं आहे. राजकारणात केवळ गणितं चालत नाहीत. तर राजकीय केमिस्ट्री चालते, असं फडणवीस म्हणाले.

चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाल्याने मला अतिशय आनंद झाला आहे. माझे सहाकरी चंद्रशेखर बावनकुळे यांना मोठा विजय मिळाला. मी स्वत: निवडून आलो तेव्हा जेवढा आनंद झाला नव्हता. त्यापेक्षा आजचा आनंद मोठा आहे. या विजयाने इथल्या महाविकास आघाडीला चपराक दिली आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

दरम्यान, बावनकुळेंचा विजय भविष्यातील विजयाची नांदी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आमच्यावर विश्वास ठेवून चंद्रशेखर बावनकुळे, राजहंस सिंह, अमरिश पटेल आणि वसंत खंडेलवाल यांना उमेदवारी दिली. तसेच नितीन गडकरींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणुका लढलो. त्यात आम्हाला निर्णायकी विजयी मिळाला. आता ही विजयाची सुरुवात आहे, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

महाविकास आघाडीतील तीन पक्ष एकत्र आले म्हणजे सर्व प्रकारचा विजय होऊ शकतो हे गणित चुकीचं आहे स्पष्ट केलं आहे. जनता भजापच्याच पाठी आहे. भविष्यातही जनतेचा भाजपला आशीर्वाद मिळेल, असंही ते म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

“दिल्लीमध्ये पवार साहेबांनी महाराष्ट्राचे सोडून 100 कार्यकर्ते तरी दाखवावेत” 

…तर 100 कोटी देतो, हा माझा शब्द आहे- अजित पवार 

“पवार हवेत गप्पा मारणारे नव्हेत, यशवंतरावानंतर महाराष्ट्राला लाभलेलं सर्वात मोठं नेतृत्व” 

 “26 खासदार असणारा गुजराती पंतप्रधान होतो मग 48 खासदार असणारा महाराजांचा मावळा…”

“शरद पवार हे पॉवर हाऊस, त्यांच्या निर्णयामुळे परिवर्तन होतं हा इतिहास आहे”