सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, नव्या वर्षात सरकारकडून मिळणार ‘हे’ गिफ्ट

नवी दिल्ली | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नव्या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून मोठं गिफ्ट मिळणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यांत वाढ करण्याचे संकेत सरकारी गोटातून मिळत आहेत.

केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या निकषानुसार 3 टक्के महागाई भत्त्यांत वाढ करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे सुधारित वेतनानुसार किमान 20 हजार रुपयांची वाढ अपेक्षित आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी निवृत्तीवेतनधारकांना देणाऱ्या डीए अर्थात एक कॉस्ट लिव्हिंग अलाउन्समध्ये वर्षातून दोनदा वाढ करण्यात येते. जानेवारी आणि जुलै महिन्यांत डीएमधील बदल घोषित केले जातात.

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 31 टक्के महागाई भत्ता अदा केला जातो. केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्यांत जुलै आणि ऑक्टोबर महिन्यांत डीएमध्ये दोन वेळा वाढ करण्यात आली आहे. 47.14  लाख केंद्र कर्मचारी आणि 68.62 लाख निवृत्तीवेतनधारकांना 31 टक्के भत्ता अदा करण्यात आला आलाय.

केंद्र सरकारने महागाई भत्यांत तीन टक्के वाढ केल्यास कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठ्या प्रमाणात फरक दिसून येईल. सरकारने यानुसार महागाई भत्यांत वाढ केल्यास कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन 8 हजार रूपयांनी वाढ होऊन 28 हजारापर्यंत पोहोचू शकते.

दरम्यान, महागाई भत्त्याची गणना कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या आधारावर केली जाते. शहरी, निम शहरी तसेच ग्रामीण भागात नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यांत फरक असतो. डीएची गणना मूळ वेतनावर केली जाते. महागाई भत्त्याची गणना करण्याचा फॉर्म्युला निश्चित करण्यात येतो.

महत्त्वाच्या बातम्या- 

MLC Election | देवेंद्र फडणवीसांच्या खांद्यावर डोकं ठेवताच बावनकुळेंना अश्रू अनावर, फडणवीसही गहिवरले 

“दिल्लीमध्ये पवार साहेबांनी महाराष्ट्राचे सोडून 100 कार्यकर्ते तरी दाखवावेत” 

…तर 100 कोटी देतो, हा माझा शब्द आहे- अजित पवार 

“पवार हवेत गप्पा मारणारे नव्हेत, यशवंतरावानंतर महाराष्ट्राला लाभलेलं सर्वात मोठं नेतृत्व” 

 “26 खासदार असणारा गुजराती पंतप्रधान होतो मग 48 खासदार असणारा महाराजांचा मावळा…”