मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांचा आज 81 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त मुंबईतील नेहरू केंद्रात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राजकीय वर्तुळातील अनेक नेत्यांनी पवारांना शुभेच्छा देत वेगवेगळ्या मुद्द्यावर भाष्य केली आहेत. महाराष्ट्राच्या (Maharashtra) नेतृत्वाने देशाच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यात एक मोठा वाटा शरद पवार यांचा असल्याचं गौरोवउद्गार खासदार अमोल कोल्हे (Amol kolhe) यांनी काढले आहे.
अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांच्या पंतप्रधान बनण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे लागतील असं वक्तव्य केलं होतं. गुजरातमध्ये 26 खासदार असताना त्यांचा पंतप्रधान होतो मग आपला का नाही, असा सवाल त्यानी विचारला होता. यावर निलेश राणे यांनी आपल्या खास शैलीत राष्ट्रवादी पक्षावर टीका केली आहे.
पवार साहेब राजकारणात इतर पक्षांची मदत घेतल्याशिवाय स्वतःच्या पक्षाच्या जीवावर काही करू शकत नाही. पवार साहेबांच नेतृत्व महाराष्ट्रात फक्त साडेतीन जिल्ह्यात आहे त्यात पण पूर्ण 100 टक्के नाही. दिल्लीमध्ये पवार साहेबांनी महाराष्ट्राचे सोडून 100 कार्यकर्ते दाखवावे, असं आव्हान राणे यांनी शरद पवार यांना दिलं आहे.
निलेश राणे हे आपल्या आक्रमक स्वभावासाठी ओळखले जातात. याअगोदरही राणे यांनी राष्ट्रवादीला मर्यादित खासदारांचा पक्ष असं म्हटलं होतं. परिणामी या टीकेवर राष्ट्रवादीकडून काय उत्तर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, भुज भूकंपावेळी शरद पवार यांची अटल बिहारी वाजपेयी यांनी वाहवा केली होती. आता मात्र संप्रदायिकांचे हादरे या देशाला बसत आहेत. त्या टोकदार भाल्याने देश रक्त बंबाळ होत आहे. टोकाची भूमिका निर्माण होत आहे त्यामुळे तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे, असं त्यांनी म्हटलं होतं.
जर 26 खासदार असलेल्या गुजरातमधील व्यक्ती पंतप्रधानपदी बसू शकते तर 48 खासदार असलेल्या महाराष्ट्रातील व्यक्ती का पंतप्रधानपदावर बसू शकत नाही. याचा विचार करण्याची गरज आहे, असंही ते म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
…तर 100 कोटी देतो, हा माझा शब्द आहे- अजित पवार
“पवार हवेत गप्पा मारणारे नव्हेत, यशवंतरावानंतर महाराष्ट्राला लाभलेलं सर्वात मोठं नेतृत्व”
“26 खासदार असणारा गुजराती पंतप्रधान होतो मग 48 खासदार असणारा महाराजांचा मावळा…”
“शरद पवार हे पॉवर हाऊस, त्यांच्या निर्णयामुळे परिवर्तन होतं हा इतिहास आहे”