मुंबई | नवरा आणि बायको यांच्यात सतत भांडणं होत असतात. तर कधी प्रेमाचा गोडवा देखील या नात्यात भर घालत असतो. अशातच एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
नलगोंडा जिल्ह्यातील कनागल मंडलच्या चेरला गौराराम गावातील ही घटना समोर आली आहे. नवीन आणि त्याची बायको या गावात राहत होती. नवीनला दारू पिण्याची सवय. कधी दारू पिला की नवीन राडा करायचा.
अशातच होळीच्या दिवशी देखील नवीन दारू पिऊन आला. दारू पिल्यामुळे त्याला मटन खाण्याची इच्छा झाली. घरी जाताना तो मटन घेऊन गेला आणि बायकोला मटन बनवायला सांगितलं.
मात्र, होळीचा सण असल्याने बायकोने मटन बनवण्यास नकार दिला. नवीनने बायकोला रागात सांगण्याचा प्रयत्न केला. तरी देखील सणासुदीला मटन करणार नाही, असं बायकोनं ठणकाऊन सांगितलं.
त्यानंतर नवीनला राग आता. त्याने पोलिसांना फोन करत बायकोची तक्रार केली. पहिल्यांदा पोलीसांनी घरगुती भांडण म्हणून फोनला महत्त्व दिलं नाही. मात्र, नवीन थांबला नाही.
त्याने एक दोन नव्हे तर तब्बल 6 वेळा पोलिसांना फोन करून बायको मटन बनवत नसल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी वेगातून थेट नवीनचं घर गाठलं.
दुसऱ्या दिवशी सकाळीच पोलीस त्याच्या घरी पोहोचले. त्यावेळी पोलिसांना नवीनच्या बायकोला काही न करता थेट नवीनला ताब्यात घेतलं. शासकीय, सार्वजनिक सेवेचा दुरूपयोग केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
धक्कादायक! मॅच सुरू असताना अचानक कोसळली गॅलरी; 200 हून अधिक जखमी; पाहा व्हिडीओ
“धनंजय मुंडे आणि माझ्यावर एखादा चित्रपट निघाला तर…”
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून तेलंगणात मोठा राडा; कलम 144 लागू
Post Officeची भन्नाट योजना! 10 वर्षांवरील मुलांचं खातं उघडा, दरमहा 2500 रुपये मिळतील
MIMच्या प्रस्तावावर शरद पवार यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…