मुंबई | महाविकास आघाडीत काही अलबेल नसल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहेत. त्यामुळे विरोधकही ठाकरे सरकारवर हल्लाबोल करत असतात.
महाविकास आघाडी सरकारमधील अनेक आमदार नाराज असल्याचं समोर आलं होतं. अशातच आता शिवसेना खासदारानं शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे.
‘आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ कोण घेते, पवार सरकार’, असं शिवसेना खासदार गजानन किर्तीकरांनी म्हटलं आहे.
राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारांना निधी जाहीर केला आहे. मात्र यावरुन अनेक शिवसेना नेते नाराज असल्याचं पहायला मिळत आहे.
एका आमदाराला त्याच्या मतदार संघात विकास कामासाठी शासनाकडून निधी मिळविण्यासाठी मोठे प्रयत्न करावे पाहावे लागते, असं किर्तीकरांनी म्हटलं आहे.
काय स्पर्धा सुरू आहे हे सर्वांना माहिती आहे. राष्ट्रवादीवाल्यांची काय डॅम्बिसगिरी चालू आहे. नाव घ्यायला हरकत नाही, अशा शब्दांत किर्तीकर यांनी राष्ट्रवादीवर टीका केली.
दरम्यान, आता हळूहळू आघाडी सरकारमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागल्याचं पहायला मिळत आहे.
महविकास आघाडीतील अंतर्गत वांदांमुळे आघाडी सरकारला तडा जाणार का?, हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बायकोनं मटन बनवलं नाही म्हणून नवऱ्याने फिरवला फोन, पोलीस घरी आले अन् घडलं भलतच!
धक्कादायक! मॅच सुरू असताना अचानक कोसळली गॅलरी; 200 हून अधिक जखमी; पाहा व्हिडीओ
“धनंजय मुंडे आणि माझ्यावर एखादा चित्रपट निघाला तर…”
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून तेलंगणात मोठा राडा; कलम 144 लागू
Post Officeची भन्नाट योजना! 10 वर्षांवरील मुलांचं खातं उघडा, दरमहा 2500 रुपये मिळतील