मलप्पूरम | केरळच्या (Kerala Football Match Audience Gallery) उत्तरेकडील भागात असलेल्या मलप्पूरम जिल्ह्यातील वंदूर इथे फुटबाॅल सामन्याचं आयोजन केलं होतं. रात्रीच्या वेळेत हा सामना भरवण्यात आला होता.
प्रेक्षकांना बसण्यासाठी चांगली बैठक व्यवस्था केली होती. तर काही जणांना उभं राहण्यासाठी देखील व्यवस्था होती. रात्री सामना सुरूच होणार होता.
मात्र, अचानक प्रेक्षकांच्या बसण्यासाठी व्यवस्था केलेली गॅलरीच खाली कोसळली. यासोबत लाईटसाठी उभे केलेले पोलही खाली कोसळले आहेत.
काही हाती आलेल्या माहितीनुसार, सामन्याआधी काही हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील झाला होता. त्यामुळे ही दुर्घटना झाल्याचा अंदाज वर्तविला जातोय.
या भीषण दुर्घटनेत 200 हून अधिक लोक गंभीर जखमी आहेत. 5 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना जवळच्या रूग्णालयात भरती करण्यात आलंय.
दरम्यान, हा सामना पाहण्यासाठी 2 हजार लोकं उपस्थित होती, असा अंदाज वर्तविला जात आहे. सध्या जखमींना उपचार मिळावेत यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत.
पाहा व्हिडीओ –
Video: Over 200 people were injured after a temporary audience gallery collapsed before the start of a football match in the Malappuram district of Kerala#Kerala #Malappuram pic.twitter.com/2KAkNA2Uhl
— The Bureaucrat (@TheBureaucrat20) March 20, 2022
महत्त्वाच्या बातम्या –
“धनंजय मुंडे आणि माझ्यावर एखादा चित्रपट निघाला तर…”
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून तेलंगणात मोठा राडा; कलम 144 लागू
Post Officeची भन्नाट योजना! 10 वर्षांवरील मुलांचं खातं उघडा, दरमहा 2500 रुपये मिळतील
MIMच्या प्रस्तावावर शरद पवार यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
भारतात कोरोनाची आणखी एक लाट येणार?; WHO ने दिला भारताला गंभीर इशारा