“उद्धव ठाकरे आजारी असल्यानं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करा”

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना मणका आणि मानेच्या स्नायुंचा त्रास होत आहे. उद्धव ठाकरे यांच्या  मानेवर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली आहे. त्यातच विरोधकांकडून मुख्यमंत्रीपदाचा चार्ज इतर नेत्यांकडे देण्याची मागणी करण्यात येत आहे.

रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले (RPI President Ramdas Athavale) यांनी मुख्यमंत्रीपदाचा कारभार थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांच्याकडे देण्याची मागणी केली आहे.

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना पत्रकारांनी मुख्यमंत्री आजारी असल्याने अनागोंदी कारभार चालला आहे का? अशावेळी मुख्यमंत्रीपद कोणाकडे सोपवावं? असा प्रश्न केला होता.

त्यावर रामदास आठवले यांनी मला वाटतं की, मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीसांकडे द्यावं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत ही गोष्ट खरी आहे. अजून त्यांना ठिकठाक होण्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

राज्यातील भाजप (BJP) नेत्यांनीही अनेकवेळा मुख्यमंत्रीपदाचा चार्ज इतर नेत्यांकडे देण्याची मागणी केली आहे. आदित्य ठाकरे( Minister Aditya Thackeray), एकनाथ शिंदे ( Minister Eknath Shinde), अजित पवार (Minister Ajit Pawar) असे अनेक पर्याय भाजप नेत्यांनी सुचवले होते.

भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी देखील मुख्यमंत्री बनवण्यावरून बोचरी टीका केली होती. भविष्यामध्ये रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवणार आहात का? राज्याला मुख्यमंत्रीचं राहिलेला नाही, असं वक्तव्य नितेश राणे यांनी  केलं होतं.

तसेच ठाकरे कुटूंबियांचा कोणावरही विश्वास राहिलेला नाही. हे यावरून सिद्ध होत आहे. एकनाथ शिंदे , सुभाष देसाई (Subhash Desai) कोणावरही विश्वास राहिलेला नाही, असं नितेश राणे म्हणाले होते.

दरम्यान, भाजप आमदार प्रसाद लाड(MLA Prasad Lad)यांनीही मुख्यमंत्रीपदाचा कारभार दुसऱ्या कोणाकडे तरी सोपवावा अशी मागणी केली होती. राज्याचा कारभार गेल्या दीड महिन्यापासून अधांतरी आहे. कोणताही महत्त्वाचा निर्णय होत नाही.

माझं मत आहे की, मुख्यमंत्र्यांनी आराम करावा आणि मुख्यमंत्री पदाचा कारभार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) किंवा अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे द्यावा, असंही प्रसाद लाड म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या- 

नितेश राणेंना अटक होणार???; पोलिसांच्या हालचालींना वेग

राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार?, शरद पवार म्हणाले…

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक रेंगाळण्याची चिन्हे; राज्यपालांची हरकत

‘नितेश राणेंनी चुकच केली’; देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा झापलं

‘तो चाऊन येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव’; विधानसभेत पुन्हा राडा