Omicron बाबत दिलासादायक माहिती; फक्त ‘त्या’ लोकांनाच ओमिक्राॅनचा धोका

मुंबई | मागील काही दिवसांपासून कोरोना रूग्णसंख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे आता देशात तिसरी लाट येणार का?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे.

कोरोना बरोबरच आता कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्राॅनची रूग्णसंख्या देखील झपाट्यानं वाढत आहे. अशातच आता केंद्र सरकार ओमिक्राॅनच्या वाढत्या रूग्णसंख्येबाबत गंभीर असल्याचं दिसत आहे.

पाश्चिमात्य देशात सध्या मोठ्या प्रमाणावर ओमिक्राॅन रूग्णसंख्या वाढत आहे. मात्र, भारतात सध्या ओमिक्राॅन रूग्णसंख्या इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारे आक्रमक पाऊल उचलत आहेत.

जानेवारीत तिसरी लाट येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहेत. त्यातच आता दक्षिण आफ्रिकेतून ओमिक्रॉनबाबत एक दिलासादायक बातमी समोर येत आहे.

अशातच उद्योगपती हर्ष गोयंका यांनी ट्विट करून हि दिलासादायक माहिती आहे. दक्षिण आफ्रिकेतील ओमिक्रॉनचा संसर्ग होणाऱ्या रुग्णांची संख्या वेगाने होत आहे. रुग्ण रूग्णालयात दाखल होत आहेत, असं हर्ष गोयंका म्हणाले आहेत.

मात्र, ज्या नागरिकांनी लसीचा एकच डोस घेतला आहे किंवा ज्या लोकांनी लसच घेतली नाही. अशा नागरिकांनाच ओमिक्रॉनचा धोका जास्त असल्याचं गोयंका यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, हर्ष गोयंका यांनी केलेल्या या ट्विटमुळे आता भारतीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. गोयंका यांनी ट्विट करताना काही आलेख देखील दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या- 

 विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक रेंगाळण्याची चिन्हे; राज्यपालांची हरकत

‘नितेश राणेंनी चुकच केली’; देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा झापलं

‘तो चाऊन येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव’; विधानसभेत पुन्हा राडा 

“अजित पवार स्वतःच्या नाकातला शेंबुड पुसा अगोदर”