मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यापासून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यातच आता शरद पवार यांनी काँग्रेसचं (Congress) अध्यक्षपद आणि इतर काही मुद्यांवर भाष्य केलं आहे.
काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार होते म्हणून तुम्हाला महाराष्ट्रात पाठवण्यात आलं का?, असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला होता. त्यावर पवारांनी उत्तर दिलं आहे.
काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक मी केली. मी स्वत: सिताराम केसरी(Sitaram Kesari) यांच्यासमोर उभा राहिलो. परंतु, उत्तर भारतातील सर्व सहकाऱ्यांनी सिताराम केसरी यांना पाठिंबा दिला, असं शरद पवार म्हणाले.
दक्षिण भारतातील सहकाऱ्यांनी मला पाठिंबा दिला. साहजिकच उत्तर भारतातील संख्या अधिक असल्याने मला यश आलं नाही, ही वस्तुस्थिती आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात येण्याचा माझा निर्णय अजिबात नव्हता. माझी दिल्लीतून महाराष्ट्रात जायची इच्छा नव्हती. जवळपास सहा-साडेसहा तास मला अत्यंत आग्रह करण्यात आला होता.
शेवटी मला काही भावनिक गोष्टी सांगण्यात आल्या. ज्या राज्यात तुम्ही वाढला, ज्या राज्यातून तुम्ही इथंपर्यंत आलात ते राज्य जळतंय. अशावेळी तुम्ही जबाबदारी घेत नसाल तर याचं आम्हाला याचं दु:ख आहे.
त्यामुळे साहजिकच मला महाराष्ट्रात यायचा निर्णय घ्यावा लागला, असं शरद पवार यांनी सांगितलं आहे. यावेळी बोलताना शरद पवार यांनी बाबरी मस्जिद प्रकरणाचा उल्लेख केला आहे.
बाबरी मशिदीचा प्रश्न आला तेंव्हा अनेक दंगली झाल्या. जवळपास 14-15 दिवस मुंबईचं जनजीवन उद्धवस्त झालं होतं. त्यावेळेस मी संरक्षण मंत्री होतो. तेव्हा तुम्ही महाराष्ट्रात असला पाहिजे, असं सांगण्यात आलं होतं.
मी आलो, माझ्या लक्षात आलं की, अशा संघर्षात निर्णय घेणारी ऑथिरीटी एकच असली पाहिजे. तेव्हा मी आणि सुधाकरराव असे दोघे होतो. त्याचे दुष्परिणाम होतात, असं लक्षात आलं. तेव्हा नरसिंहराव यांना कळवून मी परत दिल्लीला गेलो, असं शरद पवार म्हणाले आहेत.
तेव्हा वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली की, मुंबई जाग्यावर नाही आली की, संपुर्ण जगात संदेश जाईल की, हा देश स्थिरतेपासून बाजूला गेला आहे. जगात मुंबईला अधिक महत्त्व दिलं जात. विशेषत: देशाची अर्थव्यवस्था मुंबईवर अवलंबून आहे. मुंबई स्थिर झाली पाहिजे याकरिता मला पंतप्रधानांच्या निवासस्थानी बोलावण्यात आलं, असं शरद पवारांनी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“पंकजा मुंडेंना घरी पाठवण्याचं पाप केलं म्हणून भाजपची सत्ता गेली”
दिलासा नाहीच! नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम
31st सेलिब्रेशनसाठी नवी नियमावली जाहीर, वाचा काय आहेत नवे निर्बंध
एक स्वप्न साकार झालं! पंकजा मुंडेंनी मानले फडणवीसांचे आभार
शाळा-काॅलेज पुन्हा बंद होणार?; राजेश टोपे यांचं सुचक वक्तव्य