“पंकजा मुंडेंना घरी पाठवण्याचं पाप केलं म्हणून भाजपची सत्ता गेली”

मुंबई | विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे या दोघांमधील राजकीय संघर्ष हा सर्वश्रुत आहे. जाहीरपणे दोघांमध्ये वाद नसले तरीही दोघांमधील शीतयुद्ध महाराष्ट्राला ठाऊक आहे. (Dilip Mohite Patil indirectly criticizes Devendra Fadnavis)

राज्यात भाजपचं सरकार असताना देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात वादाची ठिणगी पडली होती, असं सांगितलं जातं. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत हा वाद चांगलाच गाजला होता.

देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पंकजा मुंडे यांना भाऊ आणि राषट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असते.

अशातच आता राष्ट्रवादीचे काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) यांनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघातीवर टीका केली आहे.

2014 साली गोपीनाथ मुंडे यांनी तुम्हाला ‘देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र’ म्हणत खुर्चीवर बसवलं होतं. आता त्याच गोपीनाथ मुंडे यांच्या मुलीला तुम्ही घरी पाठवण्याच पाप तुम्ही केल कशी तुम्हाला सत्ता मिळेल?, असं दिलीप मोहिते पाटील म्हणाले आहेत.

ज्यांनी उपकार केले त्यांची जाणीव तुम्ही ठेवली नाही. ज्या एकनाथ खडसेंनी तुम्हाला संधी दिली त्या एकनाथ खडसेंवर सुद्धा तुम्ही मनमानी केली, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे.

दरम्यान, बीड जिल्ह्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असणारा नगर-आष्टी रेल्वेमार्गाचं काम पुर्ण झालं आहे. बुधवारी नगरहून सोलापूरवाडी येथून आष्टीपर्यंत रेल्वे धावली. त्यामुळे आज पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

दिलासा नाहीच! नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम

 31st सेलिब्रेशनसाठी नवी नियमावली जाहीर, वाचा काय आहेत नवे निर्बंध

एक स्वप्न साकार झालं! पंकजा मुंडेंनी मानले फडणवीसांचे आभार

 शाळा-काॅलेज पुन्हा बंद होणार?; राजेश टोपे यांचं सुचक वक्तव्य

बाप-लेक अडचणीत! नितेश राणेंनंतर आता नारायण राणेंनाही पोलिसांची नोटीस