सुधीर मुनगंटीवार यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, “समलैंगिक संबंध…”

मुंबई | काल विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन (Winter session) पार पडलं. मुंबईत झालेल्या या सात दिवसांच्या अधिवेशनात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. (Controversial statement of Sudhir Mungantiwar)

अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मात्र विधानसभेत गोंधळ पहायला मिळाला. सभागृहात विद्यापीठ सुधारणा विधेयक सादर करण्यात आलं. त्यावेळी सभागृहात गदारोळ झाल्याचं दिसून आलं.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी हे विधेयक मांडलं. त्यावेळी समलैंगिक व्यक्तींनाही प्रवाहात आणण्यासाठी समान संधी देण्यात यावा, असं मत उदय सामंत यांनी मांडलं.

विद्यापीठ सुधारणा कायद्यात अशा व्यक्तींनाही विद्यापीठावर प्रतिनिधीत्व देण्याची तरतूद विधेयकात असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यातील काही गोष्टींवर सुधीर मुनगंटीवार आक्षेप घेतला.

समलैंगिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्तींना तुम्ही सदस्य नियुक्त करणार का?, असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला होता. मला समलैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा आहे, असं लिहून देईन का?, असा सवाल देखील मुनगंटीवार यांनी विचारला.

अलैगिंक संबंधांची अजून परिभाषा सांगितली नाही. अलैंगिक व्यक्ती म्हणजे जनावरांसोबत लैंगिक संबंध ठेवणारा असतो, असं वादग्रस्त वक्तव्य मुनगंटीवार यांनी केलं आहे.

दरम्यान, जनावराशी संंबंध ठेवला तर त्या जनावराला प्रमाणपत्र देणार का?, असा सवाल मुनगंटीवार यांनी उपस्थित केला होता. त्यावर आता वाद पेटल्याचं पहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“तो निर्णय माझा नव्हताच, मला यश आलं नाही ही वस्तूस्थिती”

“पंकजा मुंडेंना घरी पाठवण्याचं पाप केलं म्हणून भाजपची सत्ता गेली”

दिलासा नाहीच! नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम

 31st सेलिब्रेशनसाठी नवी नियमावली जाहीर, वाचा काय आहेत नवे निर्बंध

एक स्वप्न साकार झालं! पंकजा मुंडेंनी मानले फडणवीसांचे आभार