नवी दिल्ली | मागील महिन्यात काही मुस्लिम नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांची भेट घेतली होती. यावेळी बोलताना एआयएमआयएमचे (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी त्यांच्यावर टीका केली होती.
जे नेते भागवत यांना भेट देत आहेत ते सर्व उच्चविभूषित असून त्यांचा वास्तवासोबत काहीही संबंध नाही, असे ओवेसी यावेळी म्हणाले होते.
मागील महिन्यात माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय कुरैशी, दिल्लीचे माजी लेफ्टनंट गव्हर्नर नजीब जंग, अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे माजी कुलपती लेफ्टनंट जनरल जमीर उद्दीन शाह, माजी खासदार शाहिद सिद्दीकी आणि उद्योगपती सईद शेरवानी यांनी मोहन भागवत यांची भेट घेतली होती.
यांच्यावर असदुद्दीन ओवेसी भडकले होते. संपूर्ण जगाला आरएसएसची (RSS) विचारधारा माहित आहे. मुस्लीम समाजातील हा उच्चभ्रु वर्ग आहे. त्यामुळे तळागाळात नेमक्या काय गोष्टी घडतात, हे यांना माहित नसते, असे ओवेसी म्हणाले होेते.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी मोहन भागवत यांनी दिल्लीतील एका मशिदीला भेट दिली होती. त्यांनी यावेळी इमाम यांची देखील भेट घेतली होती.
भागवतांनी यावेळी ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे (All India Imam Organisation) प्रमुख उमर अहमद इलयासी (Omar Ahmed Ilyasi) यांची आणि त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली होती. यावेळी दोघांत गुप्त अशी एक तास बैठक चालली.
महत्वाच्या बातम्या –
व्हॉट्सअॅप आणि फेसबुक कॉलसाठी मोजावे लागणार पैसे; वाचा सविस्तर वृत्त
शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मेळावा; राज ठाकरे म्हणाले, मैदानाचा वारसा…
अमित शहांची लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमारांवर मोठी टीका; म्हणाले, लालूजींनी आयुष्यभर…
न्यायालयाने फटकारल्यावर शिंदे यांच्या गटाकडून पहिली प्रतिक्रिया; दादा भुसे म्हणाले…