“महिलांचे काही पोशाख पुरुषांना उत्तेजित करतात त्यामुळं…”, भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

बंगळुरू | कर्नाटकमध्ये सध्या हिजाब प्रकरणावरून मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. राज्य सरकार सध्या दोन धर्मात धार्मिक भांडण पेटू नये म्हणून काळजी घेत आहे.

उडपी येथील एका महाविद्यालयात हिजाब परिधान केलेल्या काही मुस्लीम मुलींना प्रवेश देण्यात आला नाही. त्यानंतर या प्रकरणानं राजकीय स्वरूप घेतलं आहे.

काॅंग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधींनी या प्रकरणावर भाष्य करताना प्रत्येक महिलेला आपण काय परिधान करावं याचं स्वातंत्र्य असल्याचं वक्तव्य केलं होतं. गांधी यांच्या या वक्तव्यावर आता भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कर्नाटकचे भाजप आमदार एम. पी. रेणुकाचार्य यांनी प्रियंका गांधींना प्रत्युत्तर देताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सध्या रेणुकाचार्य यांचं वक्तव्य चर्चेत आहे.

महाविद्यालय किंवा शाळांमध्ये शिक्षण घेत असताना मुलींनी त्यांचं पूर्ण शरीर झाकेल असे कपडे आणि गणवेश घालायला हवे, असं वक्तव्य रेणुकाचार्य यांनी केलं आहे.

महिला परिधान करत असलेले काही कपडे पुरूषांना उत्तेजित करतात. त्यामुळं बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होवू लागली आहे. हे योग्य नाही, असं वादग्रस्त वक्तव्य रेणुकाचार्य यांनी केलं आहे.

प्रियंका या मोठ्या महिला नेत्या आहेत त्यांनी महिलांबाबात बिकिनी घालण्याचं वक्तव्य केलं आहे ते योग्य नाही, अशी टीका त्यांनी प्रियंका गांधींवर केली आहे.

दरम्यान, कर्नाटकमध्ये हिजाबवरून सुरू झालेला वाद आता नवीन वळण घेत आहे. भाजप आमदारांच्या महिलांबाबतच्या या वक्तव्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “सरकार पडण्याची वेळ येते, तेव्हा मुख्यमंत्री गळ्यात बेल्ट का घालतात?”

“सुपातले जात्यात जातायेत, आधीच्याचं पीठ झालं, आता सगळे चक्की पिसणार”

 मनसेचं ठरलंय! “आम्ही किंग मेकर नाही तर किंग बनणार”

“कोरोनाला हलक्यात घेऊ नका, कारण…”; भारतीयांना अत्यंत धक्कादायक इशारा जारी

कर्नाटक हिजाब प्रकरणावर हेमा मालिनी यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…