इस्लाम धर्मात लग्न हे जन्मोजन्मीच नातं नाही तर ते केवळ कॉन्ट्रॅक्ट- असदुद्दीन ओवैसी

नवी दिल्ली | लोकसभेत आज ट्रिपल तलाक विधेयक सादर करण्यात आलं. याच विषयाच्या चर्चेदरम्यान एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी ट्रिपल तलाक कायद्यास विरोध करत इस्लाम धर्मात लग्न हे जन्मोजन्मीच नातं नाही तर ते केवळ कॉन्ट्रॅक्ट आहे, असं ते म्हणाले.

ट्रिपल तलाक विधेयक मंजूर करून घेण्यासाठी भाजप सरकार आटापिटा करत आहे. मात्र ओवैसींसह काँग्रेसचा या विधेयकाला विरोध आहे.

इस्लाम धर्मात लग्न हे जन्मोजन्मीच नातं नाही तर ते केवळ कॉन्ट्रॅक्ट आहे. यात आम्ही जीवनाच्या शेवटपर्यंत आनंदी आहोत. ट्रिपल तलाक हे विधेयक संविधानाच्या विरोधी आहे, असं मतं आज ट्रिपल तलाक विधेयकावर चर्चा करताना ओवैसी यांनी मांडलं.

न्यायालयाने समलैंगिकतेला गुन्हा नाही असं म्हटलंय… मग ट्रिपल तलाक गुन्हा कसा काय? असा सवालही ओवैसींनी उपस्थित केला. ओवैसी यांच्या भाषणानंतर भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी ट्रिपल तलाकच्या समर्थनार्थ भाषण केलं.

मोदी सरकारचा लग्न पद्धती नष्ट करण्याचा डाव आहे. मुस्लिमांना त्यांच्या सभ्यता आणि शिष्टाचारापासून दूर ठेवण्याचं काम मोदी सरकार करत असल्याचा आरोप ओवैसींनी केला.

दरम्यान, आज होणाऱ्या चर्चेसाठी लोकसभेत भाजप खासदारांसाठी व्हीप बजावला गेला होता .मागच्या वेळी हे विधेयक लोकसभेत पास झालं होतं. पण लोकसभेची टर्म पूर्ण होण्याआधी या विधेयकाला राज्यसभेत मंजुरी मिळू शकली नव्हती, त्यामुळे पुन्हा हे विधेयक लोकसभेत मांडण्याची वेळ आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादीचा ‘हा’ नेतासुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार का? यावर अजित पवार म्हणतात…

-निष्ठावंतांना डावललं तर वेगळा विचार करु; ‘या’ नेत्याचा राष्ट्रवादीला इशारा

-साताऱ्यातून ‘हा’ उमेदवार विधानसभा निवडणूक लढवेल; अजित पवारांनी जाहीर केलं नाव

-शरद पवार माझ्या ह्रदयात असतील तर उद्धव आणि आदित्य यांचं बळ अंगात असेल- सचिन अहिर

-मी काटे मोडत नाही तर, फक्त घड्याळाला चावी देतो- उद्धव ठाकरे