‘काँग्रेसचं सरकार आल्यावर आम्ही…’; प्रियांका गांधींची मोठी घोषणा

लखनऊ | देशाच्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो असं म्हटलं जातं. लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा या उत्तर प्रदेशमधील आहेत. परिणामी या राज्यात सत्ता मिळवण्यासाठी सर्व पक्ष प्रयत्न करत असतात. आगामी काळात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनीच तयारी करण्यास सुरूवात केली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये सध्या भाजपची एकहाती सत्ता आहे. गोरखपूरच्या गडीवर एकहाती वर्चस्व असणारे योगी आदित्यनाथ सध्या उत्तर प्रदेशचं नेतृत्व करत आहेत.

मागील काही काळापासून उत्तर प्रदेशमध्ये फारसा जनाधार नसलेला काॅंग्रेस पक्ष प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वात योगींना टक्कर देण्याची योजना आखत आहे.

गेली काही महिने झालं प्रियांका गांधी सातत्यानं योगी सरकारवर टीका करत आहेत. अशातच सध्या प्रियंका गांधी प्रतिज्ञा यात्रेच्या माध्यमातून उत्तर प्रदेशातील जनतेशी संवाद साधताना दिसत आहेत.

आपल्या प्रतिज्ञा यात्रेदरम्यान प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशमधील महिला मतदारांवर अधिक लक्ष दिल्याचं पहायला मिळत आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत महिलांना काॅंग्रेस 40 टक्के तिकीट वाटणार, असं प्रियांका म्हणाल्या आहेत.

उत्तर प्रदेशमधील आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांसाठी प्रियांका गांधी यांनी मोठी घोषणा केली आहे. आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांना दरमहा 10 हजार रूपये मानधन देण्याची घोषणा प्रियांका गांधी यांनी केली आहे.

आशा सेविकांनी आणि अंगणवाडी सेविकांनी कोरोनाच्या काळात राज्यातील जनतेची सेवा करण्याचं काम केलं आहे. परिणामी आमचं सरकार आल्यास त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येईल, असंही प्रियांका गांधी म्हणाल्या आहेत.

उत्तर प्रदेश सरकारनं महिलांवर फार मोठा अन्याय केल्याचा आरोप गांधी यांनी केला आहे. योगी सरकारवर प्रियांका गांधी यांनी जोरदार टीका केली आहे.

दरम्यान, काॅंग्रेस यावेळी पुर्ण ताकदीनं उत्तर प्रदेशची निवडणूक लढवणार असल्याचं प्रियांका गांधी यांच्या बोलण्यावरून लक्षात येत आहे. प्रियांका गांधी आणि  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यात निर्णायक लढाई होणार हे मात्र नक्की आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

“भाजपनं मशीन तयार केलीये, त्यात सगळे स्वच्छ होतात” 

“अडवाणी जिथे जिथे गेले तिथे त्यांनी द्वेषाची बीजे पेरली” 

मुख्यमंत्र्यांकडून नवाब मलिकांचं कौतुक, म्हणाले…’गुड गोईंग’ 

‘पद्म पुरस्कारासाठी मी लायक नाही’; आनंद महिंद्रा यांचं वक्तव्य चर्चेत 

आता इंस्टाग्राम खर्चिक होणार; मोजावे लागणार ‘इतके’ रूपये