शिवसेनेनं काय खायचं सोडलं? रस्त्यातलं डांबर, नाल्यातला कचरा; आशिष शेलारांची बोचरी टीका

मुंबई | ठाकरे सरकारच्या कारभाराविरोधात तसंच शेतकरी कर्जमाफी आणि महिला अत्याचाराविरोधात भाजप आज मुंबईतल्या आझाद मैदानावर आंदोलन करत आहे. या आंदोलनाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन आशिष शेलार यांसह महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत. यावेळी शेलारांनी केलेल्या भाषणात शिवसेनेचा खरपूस समाचार घेतला. मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन आशिष शेलार शिवसेनेवर तुटून पडले.

आजपर्यंतच्या इतिहासात मुंबई महानगरपालिकेतलं सर्वांत भ्रष्ट सरकार कोणतं? असा प्रश्न विचारला तर शेंबडा पोरगाही सांगेल की मुंबई महानगरपालिकेतलं शिवसेनेचं सरकार हे सर्वांत भ्रष्ट सरकार आहे. शिवसेनेनं काय खायचं सोडलं? रस्त्यातलं डांबर, नाल्यातला कचरा, गाय बैल आणि कुत्रे पकडणारी साधनं यामध्ये देखील पैसा खाल्ला, अशी बोचरी टीका शेलार यांनी शिवसेनेवर केली. तसंच देवेंजद्रजी वेळेअभावी यावर मी अधिक बोलणार नाही असं म्हणत त्यांनी पुढे मुंबई महानगरपालिकेतला शिवसेना-भाजप संघर्ष किती टोकाचा होणार आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला.

स्वत:ला एकवचनी म्हणणारे आता बहुवचनी म्हणवून घेत आहे. 2 लाखापर्यंत घेतलेलं कुठल्याही कामासाठी कर्ज माफ होईल, असं आम्हाला वाटलं… पण हे सरकार म्हणतंय ट्रॅक्टर, गाय, बैल यासाठी घेतलेलं कर्ज माफ होणार नाही फक्त पीकासाठी घेतलेलं कर्ज माफ होईल. या खोटं बोलणाऱ्या पापी सरकारला एकही दिवस सत्तेत बसण्याचा अधिकार नाहीये, अशी टीका शेलारांनी महाविकास आघाडीवर केली.

लाखो शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, असं म्हणणाऱ्यांनी हजारांच्या शेतकऱ्यांची यादी समोर आणली आहे. सरसकट कर्जमाफी, सातबारा कोरा या त्यांच्या घोषणा होत्या. आम्ही वचनाला आणि शब्दाला जागणारे आहोत, हे शिवसेना पक्षप्रमुखांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सांगितलं होतं. मग मुख्यमंत्री झाल्यावर काय झालं? असा सवाल शेलार यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या-

-“तुम्हाला कर्जमाफीवर बोलण्याचा अधिकार नाहीये… तुम्ही शेतकऱ्यांना फसवून खेट्या मारायला लावल्या”

-…तर उद्धवजी अन् अजितदादा, शेतकरी कर्जमाफीला 400 महिने लागतील- फडणवीस

-सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज चढलाय; आशिष शेलारांची जहरी टीका

-इंदोरीकर महाराजांना दिलासा; सायबर सेलचा मोठा खुलासा

-“अजित पवारांनी मतदारांच्या प्रपंचात माती कालवली; निवडणुकीत तब्बल 50 कोटी वाटले”