सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज चढलाय; आशिष शेलारांची जहरी टीका

मुंबई | अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसऱ्या दिवशी सभागृहात प्रश्नोत्तराचा तास चालू होण्याआधीच विरोधकांनी घोषणाबाजी केली. त्याअगोदर त्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करत सरकारच्या कारभाराचा निषेध व्यक्त केला. त्यावर अजित पवारांनी खोचक टोला लगावला. अजित पवारांच्या टोला शेलार यांच्या भलताच जिव्हारी लागला. मग मात्र चिडलेल्या आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जहरी टीका केली.

सत्तेत बसलेल्या सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी आवाज उठवलेल्या मुद्द्यांकडे लक्ष देण्याऐवजी विकृतपणे भाष्य करणं यातूनच सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज चढलाय हे दिसून येतं, अशी जहरी टीका आशिष शेलार यांनी अजित पवारांचं नाव न घेता केली. सामान्य जनतेसाठी आमचा घसा कोरडाच काय, घसा फुटला तरी आम्ही त्यांच्यासाठी लढू, असं शेलार म्हणाले.

तत्पूर्वी भाजप नेत्यांकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून देण्यात आलेल्या घोषणा पाहून आम्हालाही मागचे दिवस आठवले… आमचाही घसा असाच कोरडा पडायचा असा खोचक टोला अजित पवार यांनी भाजप नेत्यांना लगावला होता.

लाखो शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, असं म्हणणाऱ्यांनी हजारांच्या शेतकऱ्यांची यादी समोर आणली आहे. सरसकट कर्जमाफी, सातबारा कोरा या त्यांच्या घोषणा होत्या. आम्ही वचनाला आणि शब्दाला जागणारे आहोत, हे शिवसेना पक्षप्रमुखांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सांगितलं होतं. मग मुख्यमंत्री झाल्यावर काय झालं? असा सवाल शेलार यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या-

इंदोरीकर महाराजांना दिलासा; सायबर सेलचा मोठा खुलासा

-इंदुरीकरांच्या वक्तव्यावरून होत असलेल्या वादात आता शिवप्रतिष्ठानची उडी!

-इंदुरीकरांना पाठिंबा देण्यासाठी तांदळवाडीचे महाराज झोपले बाभळीच्या काट्यावर!

-नकळत बोलून गेले असतील… त्याचं इतकं काय भांडवल करता?- सिंधुताई सपकाळ

-“मासिक पाळीत स्वयंपाक करणारी महिला पुढच्या जन्मी कुत्री होणार”