…तर उद्धवजी अन् अजितदादा, शेतकरी कर्जमाफीला 400 महिने लागतील- फडणवीस

मुंबई |  ठाकरे सरकारने सत्तेत येताच शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीच्या अंमलबजावणीचं कामही सुरू झालं आहे. मात्र विरोधकांनी महाविकास आघाडीच्या शेतकरी कर्जमाफीवर जोरदार आसूड ओढले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीवरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे.

एक नवा पैसाही शेतकऱ्याला दिलेला नाही. असली कर्जमाफी करून ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. सातबारा कोरा करू म्हणणाऱ्यांची भाषा आता बदलली आहे, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. दोन महिन्यात सरकारने 15 हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे. महिन्याला साडेसात हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा विक्रम या सरकारने केला आहे. अशा वेगाने 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी 400 महिने लागतील, असं फडणवीस म्हणाले आहेत.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसऱ्या दिवशी सभागृहात प्रश्नोत्तराचा तास चालू होण्याआधीच विरोधकांनी घोषणाबाजी केली. त्याअगोदर त्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करत सरकारच्या कारभाराचा निषेध व्यक्त केला

दरम्यान, शेतकरी आणि शेतमजूरांसाठी आमचा घसा कोरडाच काय फाटला तरी आम्ही त्यांच्यासाठी सरकारविरोधात लढू, असा एल्गार आशिष शेलार यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज चढलाय; आशिष शेलारांची जहरी टीका

इंदोरीकर महाराजांना दिलासा; सायबर सेलचा मोठा खुलासा

-इंदुरीकरांच्या वक्तव्यावरून होत असलेल्या वादात आता शिवप्रतिष्ठानची उडी!

-इंदुरीकरांना पाठिंबा देण्यासाठी तांदळवाडीचे महाराज झोपले बाभळीच्या काट्यावर!

-नकळत बोलून गेले असतील… त्याचं इतकं काय भांडवल करता?- सिंधुताई सपकाळ