मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यासाठी आज महत्त्वाचा दिवस होता. कारण आज विधानसभेत महाविकास आघाडीची बहुमत चाचणी झाली. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.
महाविकास आघाडीला बहुमत आहे, तर मग भिती कशाची ? आपल्या आमदारांवर मुठभरही विश्वास नाही, मग महाआघाडी कशाची? सत्यमेव जयते म्हणताय मग असत्यमेवची वाट का धरताय? ‘वाघाचं’ नाव घेऊन ‘सशाच्या’ काळजाचे सरकार का आणताय?, असा सवाल शेलारांनी केला आहे.
महाविकास आघाडीच्या शपथविधीवर भाजपकडून आक्षेप घेण्यात आला आहे. ठाकरे सरकारचा शपथविधी बेकायदा असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
आज दुपारी दोन वाजता महाराष्ट्र विकास आघाडीची बहुमत चाचणी होत आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षांकडून आपल्या आमदारांना व्हीप बजावण्यात आला आहे. विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान करण्याचा पक्षादेश या व्हीपमध्ये देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
या पठ्यानं घेतल्या 6 चेंडूत तब्बल 5 विकेट; मैदानावर घातलं धुमशान!- https://t.co/Xjc9ImAuBZ @BCCIdomestic @ICHOfficial @IPL @abhimanyumithun @himanshurane @cricketworldcup
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) November 30, 2019
“चंद्रकांत पाटील आवरतं घ्या, नाहीतर महाराष्ट्र पेटायला वेळ लागणार नाही” – https://t.co/I54iwcHwUH @Awhadspeaks @ChDadaPatil
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) November 30, 2019
‘या’ क्रिकेटपटूचं धोनीच्या भवितव्याबद्दल मोठं वक्तव्य! – https://t.co/lUypg0TLfq @msdhoni @SGanguly99
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) November 30, 2019