आशिष शेलारांचा राष्ट्रवादीला मोठा दणका; म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस हा फक्त दोन-अडीच…

मुंबई | आज राज्यातील अनेक ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागला. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार आशिष शेलार (Asish Shelar) यांनी पत्रकार परिषद घेत विरोधक, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला.

संपूर्ण राज्यात क्रमांक एकचा पक्ष भाजप आहे, हे आजच्या विजयाने जाहीर केले आहे, असे शेलार म्हणाले. आम्ही नम्रतेने हा विजय स्वीकारतो आणि जनतेची सेवा दुप्पट वेगाने करु असे आश्वासन शेलार यांनी यावेळी दिले.

यावेळी बोलताना पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष दोन अडीच जिल्ह्यांपर्यंत मर्यादीत पक्ष आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा दोन अडीच जिल्ह्यांपुरता मर्यादीत पक्ष आहे. तो राज्यस्तरावरचा पक्ष नाही. काही लोक रात्री स्वप्न बघतात हे आम्हाला माहित होते. पण जयंत पाटील (Jayanta Patil) दिवसा स्वप्न बघतात, असे शेलार म्हणाले.

आता पुन्हा एकदा सिद्ध झाले की, राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला संपवित आहे. त्याचमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या 40 आमदारांनी उठाव केला असल्याचे शेलार म्हणाले.

आजच्या निकालात भाजप हा क्रमांक एकचा पक्ष आहे आणि क्रमांक दोनचा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस आहे. आणि शिवसेना चौथ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा उठाव योग्य असल्याचे शेलार म्हणाले.

दरम्यान, आशिष शेलार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाल दोन – अडीच जिल्ह्यांचा पक्ष म्हंटल्याच्या वक्तव्यावर अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.

महत्वाच्या बातम्या – 

‘दारुच्या नशेत असल्याने…’; पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप

वॉट्सएपचे नवीन अपडेट देणार आहे ‘हे’ नवीन फिचर्स; सर्वांना याचीच प्रतीक्षा होती

“…तर महाराष्ट्रातील महिला वर्ग रामदास कदमांची जोड्याने पूजा करील” – भास्कर जाधवांची मोठी टीका

भाभा अणुसंशोधन केंद्रात मोठी भरती; 56100 ते 78800 प्रतिमहा पगारासाठी जागा रिक्त

मोठी बातमी: संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीबाबत मोठी माहीती समोर