मुंबई | वेदांता फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) हा मोठा प्रकल्प पुण्यातील तळेगाव येथे होणार होता. पण ऐनवेळी कंपनीने हा प्रकल्प गुजरातला हलविण्याचा निर्णय घेतला आणि जाता जाता महाराष्ट्राचे राजकारण तापवून गेला.
दोन लाख रोजगार निर्मितीची क्षमता असलेला आणि तेवढाच महसूल देखील राज्याला देणारा हा प्रकल्प गेल्याने विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर तुटून पडले. त्यावर अद्याप आरोप आणि प्रत्यारोप सुरु आहेत. आता यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार (Rohit Pawar) यांनी भाष्य केले आहे.
महाविकास आघाडीच्या काळात सगळ्या गोष्टी नक्की झाल्या होत्या. जागेची किंमत, टॅक्स बेनिफिट आणि इतर तांत्रिक आणि कागदोपत्री गोष्टी देखील नक्की झाल्या होत्या.
तेवढ्यात महाविकास आघाडी सरकार (MVA) बदलले. नव्या सरकारने देखील या प्रकल्पासाठी प्रयत्न केले असावेत. पण 5 सप्टेंबर रोजी वेदांताचे अधिकारी अग्रवाल (Agarwal) पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) भेटले आणि सगळ्या गोष्टी बदलल्या, असे रोहीत पवार म्हणाले.
हा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर ते लोक तिकडे जागा शोधत आहेत. म्हणजे येथे ताट वाढले असताना, गुजरातला आता त्यांनी जेवण तयार करण्याची सुरुवात केली आहे, असे पवार यावेळी म्हणाले.
त्यामुळे फॉक्सकॉनचे अद्याप गुजरातमध्ये काहीही नक्की झालेले नाही. तो प्रकल्प महाराष्ट्रात पुन्हा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता तो परत महाराष्ट्रात कसा आणता येईल, याचा विचार करायला हवा, असे पवार म्हणाले.
गेल्या दहा वर्षात महाराष्ट्राचे महत्व कमी केले आहे किंवा ते आपोआप झाले आहे. या गोष्टी सर्वांनी लक्षात घेतल्या पाहिजेत. त्यामुळे आगामी काळात काळजी घेतली पाहिजे, असे पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
आशिष शेलारांचा राष्ट्रवादीला मोठा दणका; म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस हा फक्त दोन-अडीच…
‘दारुच्या नशेत असल्याने…’; पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप
वॉट्सएपचे नवीन अपडेट देणार आहे ‘हे’ नवीन फिचर्स; सर्वांना याचीच प्रतीक्षा होती
“…तर महाराष्ट्रातील महिला वर्ग रामदास कदमांची जोड्याने पूजा करील” – भास्कर जाधवांची मोठी टीका
भाभा अणुसंशोधन केंद्रात मोठी भरती; 56100 ते 78800 प्रतिमहा पगारासाठी जागा रिक्त