“उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं अस्तित्व भाजपमुळेच आहे”

मुंबई | राज्यातील राजकारणात मागील काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींनी राजकारणात वेगळंच वळण आणलं. शिंदेंनी केलेलं बंड आणि त्यानंतर झालेलं सत्तांतर यावर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यासोबतच्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर आणि शिंदे गटावर टीका केली आहे.

उद्धव ठाकरेंच्या टीकेवर आता शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे नेते आशिष शेलार (ashish shelar) यांनीही या मुलाखतीवरून उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं अस्तित्वच मुळी भाजपमुळे असल्याचा दावा आशिष शेलार यांनी केला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या शिवाय उद्धव ठाकरे यांची मुलाखत म्हणजे रुदालीचा कार्यक्रम होता. मुलाखतीपेक्षा टीझर तरी बरा होता, अशी टीका त्यांनी केलीये.

या मुलाखतीतून केवळ भाजपला इशारे देण्यात आले आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना जेव्हा आमच्यासोबत होती. तेव्हाही आम्हाला इशारे देतच होते. मुख्यमंत्री झाल्यावरही आम्हाला इशारे देण्यात आले. आता एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले तरी इशारे देणे सुरूच आहे, असं शेलार म्हणालेत.

तुम्ही मुख्यमंत्री असताना ममता बॅनर्जींना भेटत होता. केसी राव यांना भेटत होता. सोनिया गांधी यांच्याशी बोलत होता. या लोकांशी तुम्ही काय बोलत होता? आण्ही जेव्हा शब्द देतो तेव्हा तो पाळत असतो. कटकारस्थान करत नाही, असं प्रत्युत्तरही शेलार यांनी दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

नक्की कुठे चुकलं?, उद्धव ठाकरे म्हणाले ‘गुन्हा माझाय, चूक माझी आहे’ 

शिवसेनेतच फूट का पडते?, उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण 

‘…त्याच आईला गिळायला निघालेली ही अवलाद’; उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंवर बरसले 

“मी बरा होऊ नये म्हणून काहींनी देव पाण्यात बुडवले, तेच पक्ष बुडवायला निघालेत”