मुंबई | महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर संजय राऊतांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची महामुलाखत घेतली. एकनाथ शिंदेंची बंडाळी ते महाराष्ट्रातील सत्तापालट या सर्व राजकीय घडामोडींवर उद्धव ठाकरेंनी त्यांची बाजू मांडली.
शिवसेना कोणाची?, धनुष्यबाण कोणाचा?, शिवसेनेत फूट पडली त्याला कोण जबाबदार? महाविकास आघाडीचा प्रयोग फसला का? अशा अनेक रोखठोक प्रश्नांची उत्तरं उद्धव ठाकरेंनी दिली.
संजय राऊतांनी घेतलेल्या उद्धव ठाकरेंच्या या मुलाखतीवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. मनसे व भाजपकडून ठाकरेंच्या मुलाखतीची खिल्ली उडवण्यात आली.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील या मुलाखतीवरून टीका केली आहे. चित्रा वाघ यांनी ट्विट करत संजय राऊत व उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
काय ते प्रश्न. काय ती उत्तरं. काय ती घरातल्या घरातली मुलाखत.. काय तो घरगुती कार्यक्रम.. एकदम ओक्के, असा शहाजीबापू स्टाईल टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे.
दरम्यान, शिवसेनेतील बंडाचं खापर संजय राऊत व उद्धव ठाकरे यांच्यावर फोडलं जात आहे. त्यात या महामुलाखतीततून उद्धव ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर हा सहानुभुती मिळवण्याचा प्रकार असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं अस्तित्व भाजपमुळेच आहे”
“तुमच्यात कर्तृत्व नाहीये, तुम्ही मर्द नाहीत, शिवसेनेच्या बापाचा फोटो लावून भीक मागू नका”
नक्की कुठे चुकलं?, उद्धव ठाकरे म्हणाले ‘गुन्हा माझाय, चूक माझी आहे’
शिवसेनेतच फूट का पडते?, उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण
‘…त्याच आईला गिळायला निघालेली ही अवलाद’; उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंवर बरसले