“तुमच्यात कर्तृत्व नाहीये, तुम्ही मर्द नाहीत, शिवसेनेच्या बापाचा फोटो लावून भीक मागू नका”

मुंबई | राज्यातील राजकारणात मागील काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींनी राजकारणात वेगळंच वळण आणलं. शिंदेंनी केलेलं बंड आणि त्यानंतर झालेलं सत्तांतर यावर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यासोबतच्या मुलाखतीमध्ये रोखठोक उत्तर दिली आहेत.

तुमच्यात हिंमत नाहीये. तुम्ही मर्द नाहीत. तुम्ही विश्वासघातकी आहात. आणि माझा तर विश्वासघात केलाच, लोकांचा विश्वासघात करताना बाळासाहेबांबद्दल संभ्रम निर्माण कशाला करताय? तुम्ही स्वतःला मर्द वगैरे समजता ना? तुमचा मर्दाचा चेहरा घ्या, जा पुढे आणि मागा मतं, असं आव्हानही उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना केलं आहे.

ज्यांच्यावर आम्ही विश्वास टाकला त्यांनीच विश्वासघात केलाय. तेच आता आम्ही हिंदुत्व सोडलंय म्हणून आवई उठवताहेत, बोंब मारताहेत. त्यांना मला हाच प्रश्न विचारायचा आहे की, 2014 साली भाजपने युती तोडली होती, तेव्हा आपण काय सोडलं होतं? काहीच सोडलं नव्हतं. आजही आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय.

नगरविकास खातं मुख्यमंत्र्यांकडे असायला पाहिजे. मलईदार खातं आहे म्हणतात. पण मी ते खातं माझ्याकडे न ठेवता विश्वासाने त्यांच्याकडे सोपवलं होतं. मी मलई बिलई खाण्यासाठी गेलो नव्हतो, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

मी माझ्याकडे जी खाती ठेवली होती ती एक म्हणजे सामान्य प्रशासन, दुसरे न्याय व विधी. होय, आयटीही ठेवलं, कारण खरंच या तंत्रज्ञानाचा उपयोग सगळ्या खात्यांसाठी काहीतरी करता येईल का? हा माझा विचार होता, असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

नक्की कुठे चुकलं?, उद्धव ठाकरे म्हणाले ‘गुन्हा माझाय, चूक माझी आहे’ 

शिवसेनेतच फूट का पडते?, उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण 

‘…त्याच आईला गिळायला निघालेली ही अवलाद’; उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंवर बरसले 

“मी बरा होऊ नये म्हणून काहींनी देव पाण्यात बुडवले, तेच पक्ष बुडवायला निघालेत” 

शिवसेनेला आणखी एक मोठा झटका, अर्जुन खोतकर शिंदे गटात सामील?