मुंबई | काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजचा पुनर्विचार करावा, अशी मागणी केल्यानंतर ठाकरे सरकारमधील मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील केंद्राच्या पॅकेडवर सडकून टीका केली आहे. केंद्राने जाहीर केलेले पॅकेज म्हणजे ‘खोदा पहाड, निकला जुमला’, अशा शब्दात त्यांनी केंद्र सरकारच्या पॅकेजवर टीकास्त्र सोडलं आहे.
सारख्या जागतिक संकटकाळात पालकत्वाची जबाबदारी निभावण्यात केंद्र सरकार साफ अपयशी ठरले असून, त्यांनी जाहीर केलेले पॅकेज म्हणजे ‘खोदा पहाड, निकला जुमला’ ठरले आहे, अशी टीका चव्हाण यांनी केली आहे.
केंद्राने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये शेतकरी, शेतमजूर, कामगारांना कोणतेही नवीन थेट भरीव आर्थिक अनुदान मिळाले नाही. मनरेगाच्या सर्व मजुरांच्या खात्यात मदत म्हणून भरीव रक्कम जमा करण्याची आणि कामांचे दिवस वाढवण्याची गरज होती. पण केंद्राला सर्वसामान्यांच्या व्यथा आणि गरजा समजल्याच नाहीत, असं चव्हाण म्हणाले.
कोरोनाविरूद्धची प्रत्यक्ष लढाई राज्ये लढत असल्याने केंद्राने त्यांना परिस्थितीनुरूप भरीव आर्थिक मदत द्यायला हवी होती. पण केवळ वाढीव कर्ज घेण्याची परवानगी देऊन केंद्राने राज्यांना वाऱ्यावर सोडले. राज्यांना त्यांच्या हक्काचा जीएसटी परतावा सुद्धा वेळेवर दिला जात नाही, असंही चव्हाण म्हणाले आहेत.
#CoronaPandemic सारख्या जागतिक संकटकाळात पालकत्वाची जबाबदारी निभावण्यात केंद्र सरकार साफ अपयशी ठरले असून, त्यांनी जाहीर केलेले पॅकेज म्हणजे ‘खोदा पहाड, निकला जुमला’ ठरले आहे.#JumlaPackage
— Ashok Chavan (@AshokChavanINC) May 17, 2020
महत्वाच्या बातम्या-
-उद्धवा अजब तुझे सरकार, गजब तुझा कारभार; सोमय्यांचा पुन्हा राज्य सरकारवर निशाणा
-सिलेंडर संपल्याने अंध दाम्पत्याची उपासमार; पोलिसांनी दिला मदतीचा हात
-अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचा ‘तो’ दावा खोटा- अनिल देशमुख
-“सरकारच्या कामावर शरद पवार समाधानी, राज्य सावरण्यासाठी त्यांची धडपड अद्भुत”
-संजय राऊत यांच्या ‘त्या’ मागणीला आदित्य ठाकरेंचा विरोध; ट्विटरवरुन दिलं उत्तर