अशोक चव्हाणांना ‘हे’ पद देण्याची सोनिया गांधींची इच्छा, पण चव्हाण म्हणतात…

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मध्य प्रदेशचे प्रभारी बनावे, अशी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची इच्छा आहे. मात्र सोनिया गांधींचा निर्णय अशोक चव्हाण यांना मान्य नसल्याचं समोर आलं आहे.

मला दिल्लीचं राजकारण करायचं नाही. मी राज्यातच पक्षाचं काम करेन, असं अशोक चव्हाणांनी सोनिया गांधींना स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यांनी यासंदर्भात सोनिया गांधींना फोन केला होता. 

सोनिया गांधी अध्यक्षा बनल्यानंतर अशोक चव्हाणांना मध्य प्रदेशचे प्रभारी बनन्याची संधी दिली होती. मात्र त्यांनी ती संधी नाकारल्याची माहिती मिळत आहे. अशोक चव्हाण हे महाराष्ट्रातील बडे नेते आहेत. त्यांना दिल्लीत आणून त्यांच्या अनुभवाचा वापर करता येईल, असं सांगत सोनिया गांधींनी चव्हाणांना संधी दिली होती. 

महाराष्ट्रात आता निवडणूक आहे. मी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष नसलो तरी मी राज्यात राहून पक्षासाठी काम करेन, असं म्हणत अशोक चव्हाणांनी सोनिया गांधींच्या इच्छेला नकार दिला आहे. 

महत्वाच्या बातम्या-