अखेर अशोक गहलोत अध्यक्षपदाचे उमेदवार; आता राजस्थानचे मुख्यमंत्री कोण?

नवी दिल्ली | काँग्रेसमध्ये (Indian National Congress) अध्यक्षपदाच्या निवडीची सध्या धामधूम आहे. आणि दुसरीकडे काँग्रेचे नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) हे भारत जोडो यात्रेवर आहेत.

काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस कुटुंबिय सहभाग घेणार नाही. त्यामुळे यंदा काँग्रेसला काँग्रेस परिवारमुक्त अध्यक्ष मिळणार आहे. अध्यक्षपदासाठी अनेक नावे चर्चेत होती.

त्यात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) आणि तिरुअनंतपूरमचे खासदार शशी थरुर (Shashi Tharoor) अग्रस्थानी होते. साधारण 22 वर्षांनी काँग्रेसमध्ये अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे.

अशोक गहलोत हे मागील काही काळ द्विधा मनस्थितीत होते. त्यांना राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडायचे नव्हते आणि काँग्रेस अध्यक्ष पदाची देखील निवडणूक लढवायची होती.

गहलोत यांच्या नावाला गांधी कुटुंबाचा देखील पाठिंबा होता. त्यामुळे आता अशोक गहलोत यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. काँग्रेसच्या एक व्यक्ती एक पद नियमानुसार आता त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागणार आहे.

म्हणून आता राजस्थानची धुरा कोणाकडे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. गहलोत काँग्रेस अध्यक्षांच्या निवडीचा अर्ज भरणार आहेत आणि निवडणूक देखील लढणार आहेत, असे त्यांना सांगितले.

राजस्थानातील नेतृत्व माझ्या पश्च्यात कोण सांभाळणार हे आमचे प्रभारी सरचिटणीस अजय माकन (Ajay Makan) आणि काँग्रेचे हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) ठरवतील, असे माहिती गहलोत यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या – 

भाजपात प्रवेश करणार का? एकनाथ खडसेंचे स्पष्टीकरण

पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद, अल्लाह-हू-अकबरच्या घोषणा; वाचा सविस्तर वृत्त

मुस्लिम नेत्यांच्या मोहन भागवत भेटीवर असदुद्दीन ओवेसी संतापले; म्हणाले, हे सर्व मुसलमान उच्चभ्रु …

व्हॉट्सअ‌ॅप आणि फेसबुक कॉलसाठी मोजावे लागणार पैसे; वाचा सविस्तर वृत्त

उच्च न्यायालयाने फटकारल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना पळ काढला; नेमके काय म्हणाले शिंदे?